नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन मध्ये, कु.साईशा शशिकांत तळोकार प्रथम
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:
विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकासामध्ये प्रचंड वाढ करण्याच्या एकमेव उद्दिष्टाने एवरेस्ट अबॅकस अकॅडमी दर्यापूरच्या वतीने नॅशनल लेवल कॉम्पिटिशन पारितोषिक वितरण समारंभ अमरावती येथे नुकताच पार पडला. यामध्ये कु. साईशा शशिकांत तळोकार हिला लेव्हल 3 मध्ये प्रथम विजेता हे पारितोषिक अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रविंद्र विठ्ठलराव गायगोले यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार बच्चु कडु, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक कार्यकारी अधिकारी पंकज कुमार सपकाळ, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, दर्यापूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डी.सी.गायकवाड, गोल्डन किड्स च्या मुख्याध्यापिका नम्रता खंडारे, संस्थाध्यक्ष अशोक घडेकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रतिभा पुजारी यांनी केले.
कु. साईशा तळोकार हिला रेणुका घडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीचे सर्व हितचिंतक, विद्यार्थी, पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या सुयशासाठी कु. साईशा शशिकांत तळोकार हिचे सर्वत्र कौतुक होत असुन, जिल्ह्यातील सर्व स्तरावरुन तिच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.