नुंह येथील धार्मिक यात्रेवर झालेल्या हल्लावरुन बजरंग दल आक्रमक, आंदोलनाचा इशारा!
संजय गवळी अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट : हरियाणा राज्य मेवात जिल्ह्यातील नुंह येथे बजरंग दलाच्या वतीने आयोजित शिवमंदिरातुन निघणाऱ्या धार्मिक यात्रेवर जाती विशेष समाजकंटका कडुन संशस्त्र हल्ला चढविला सदर हल्ला हा पुर्व नियोजित असुन त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला. तसेच शेंकडों वाहनांना आग लावण्यात आली यामध्ये दोन होमगार्ड जवानांचा काही शिवभक्ताचा मृत्यू झाला आहे तसेच मोठ्या संख्येने हिंदू बांधव ज्या मध्ये महिला पुरुष लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत अशा अमानुष हल्लाचा अकोट विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कठोर शब्दांत निंदा करीत आहे. तसेच या हल्ल्यांचा मास्टर माईंड शोधून त्याला व हल्ल्यातील दोषी जाती विशेष समाजकंटकाना कठोर शासन व्हावे, करीता समाजकंटकांनी केलेल्या सशस्त्र हल्लाचा कठोर शब्दांत निषेध नोंदवण्यात आला.तसेच अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल आप्पा गोडागंरे, गजानन माकोडे, विजय चंदन, सारंग कराळे, शिवा टेमझरे ,गोपाल कटाळे, राजेश चंदन, हर्षल अस्वार, शाम सपकाळ, शुभम चंदन, अमोल वायके ,मनिष बुदले, संतोष बुंदले, योगेश मेहरे ,किशोर देठे, पियुष बोचे, निशिकांत बेराड ,वैभव तेलगोटे,विकी ढोले, प्रमोद मांडे, ज्ञानेश्वर घायल सह मोठ्या संख्येने बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)