मणिपूर येथील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या,
आदिवासी समाजाची मागणी,
संजय गवळी अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट : मणिपूर येथील निंदनीय घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या वतीने राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांना २८ जुलै रोजी अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे,
आदिवासी महिलेला निवस्त्र करून रस्त्यावर धिंड काढण्याचा प्रकार दिनांक ४ मे २०२३रोजी मनिपुर मध्ये घडला या प्रकारामुळे
या आदिवासी समाजाने निषेध केला असून घटनेबद्दल प्रचंड संतापाशी लाट पसरली आहे नैतिकतेची जबाबदारी घेत मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली या जमावातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून जलद न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा आदिवासी समाज त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा निवेदनात दिला निवेदन देताना अखिल भारतीय आघाडी विकास परिषद जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर सोळुंके, भिल समाज विकास समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष देविदास भास्कर ,एकलव्य पथकाचे अध्यक्ष तथा समाजसेवक पांडुरंग तायडे, कोरकू समाजाचे अध्यक्ष वस्तापूर सरपंच संजय काजदे, तालुकाध्यक्ष हिरालाल कासदेकर, सुभाष भोयर, अभिजीत सोळंके, अविनाश डीगर, जानराव बेलसरे, शांताराम मोरे, शंकर भारसाकडे, सोनलाल पवार, बापूराव तायडे, रितिक रिंगे गौरव सोळंके आदित्य सोळंके यावेळी आदिवासी भिल समाज बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते,