अंजनगाव सुर्जी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने ऐतिहासिक भारत बंद

दि.7आँगष्ट 2023
अंजनगाव सुर्जी
मणिपूर येथील आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आणि केंद्र सरकार देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत असणाऱ्या धोरणाच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने ऐतिहासिक भारत बंद

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आज दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी अंजनगाव सुर्जी येथे अमरसिंग जावरकर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तालुका संयोजक अंजनगाव सुर्जी तसेच प्रमिलाताई खंडारे राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ तालुका संयोजक वैशाली हेरोळे बुध्दिस्ट इंटरनँशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये अंजनगाव सुर्जी येथे मणिपूर येथे महिलांवरती झालेल्या अत्याचाराचे विरोधात भारत बंदचे आयोजन करण्यात आलेले होते.
गेल्या दोन महिन्यापासून मणिपूर येथे आदिवासी महिलांवरती व लोकांवरती अन्याय अत्याचार वाढलेला असून त्यामध्ये विशेष करून महिलांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केला जात आहे. देशाचे माननीय प्रधानमंत्री यांचा नारा आहे ‘ बेटी बचाओ बेटी पढाओ’ परंतु आज या देशांमध्ये महिला सुरक्षा नावाची यंत्रणा आहे की नाही असा प्रश्नचिन्ह आज सरकारच्या या वागण्यावर निर्माण झालेला आहे. देशाचा व प्रत्येक घरचा मान सन्मान असलेली मुलगी महिला आई बहीण हि आज अत्यंत भीतीच्या वातावरणात जीवन जगत असतांना दिसत आहे. मणिपूर येथील महिलांवरती अन्याय अत्याचार बलत्कार करून व त्यांना निर्वस्त्र करून रस्त्यावर त्यांची जाहीरपणे दिंड काढल्या गेलेली आहे. त्यांच्या गुप्तांगांना स्पर्श करून त्यांचा मान सन्मान त्याची धिंड काढल्या गेली असतांना सुद्धा तेथील नामर्द जनतेने व पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेता उलट त्या कृत्याचा त्यांनी मनसोक्त आनंद लुटला.हे घनघोर र्कुत्य करणाऱ्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची ॲक्शन न घेता तेथील राज्य सरकार व केंद्रातील केंद्र सरकार घेत असतांना दिसत नाही. ही अत्यंत लाजिरवाणी व घटना असतानाही या घटनेवर देशाचे प्रधानमंत्री देशाचे गृहमंत्री त्याचप्रमाणे देशाच्या महिला आदिवासी राष्ट्रपती यांनी कुठल्याही प्रकारचे स्टेटमेंट दिलेले नसून गुन्हेगार आजही मोकळे फिरत आहेत. आज महिलांप्रती त्यांची असलेली उदासीनता संपूर्ण देशाला दिसून आलेली आहे. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने चार टप्प्यांमध्ये आंदोलन उभे केलेले होते. त्या आंदोलनाचा चौथा टप्पा अंजनगाव सुर्जी एसटी डेपो अग्रसेन चौक येथे चक्काजाम करण्यात आला होता. मनिपुरच्या घटनेमध्ये ज्या महिलांना निर्वस्त्र करून रोडवरती धिंड काढण्यात आली आणि देशातील इतर महिलांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये हा भारत बंद पुकारण्यात आलेला होता.
तसेच केंद्रातील वर्तमान सरकार हे आदिवासींच्या विरोधात आणि एससी एसटी ओबीसी च्या विरोधामध्ये युनिफॉर्म सिविल कोड समान नागरी कायदा आणण्याच्या तयारी मध्ये आहे. जर देशांमध्ये समान नागरीक कायदा लागू झाला तर इथले मूलनिवासी असलेले एसटी एससी ओबीसी व आदिवासी यांची ओळख संपणार आहे व त्यांना हक्क अधिकारापासून वंचित केल्या झाल्या जाणार आहे. म्हणून समान नागरी कायदा सुद्धा देशात लागू झाला नाही पाहिजे याच्या विरोधामध्ये हा भारत बंद केला गेला होता. विकासाच्या नावावर आणि पर्यावरण संरक्षणाच्या नावावर आदिवासी बांधवांना जल जंगल संपत्ती पासून वंचित करून त्यांना जंगलाच्या बाहेर जबरदस्तीने काढून त्यांचे विस्थापन केले जात आहे. जे संविधानाच्या अनुसूची पाच व सहाच्या विरोधामध्ये आहे. 2020 ,2021 व 2022 मध्ये आदिवासी बांधवांच्या विरोधामध्ये जे बिल संसद मध्ये पारित केलेले आहे ते 2023 च्या नवीन फॉरेस्ट कायद्यानुसार आदिवासींच्या अस्तित्वाला धोक्यामध्ये आणणारे आहे.म्हणून हे बिल रद्द झाले पाहिजे याकरिता हा भारत बंद पुकारण्यात आलेला होता . जंगलांचे निजीकरण करून ते अदानी अंबानी सारख्या उद्योगपतींना दिल्या जात आहे. आणि त्याकरिता अनुसूची पाच व सहा संपवून आदिवासी बांधवांना सक्तीने जंगलाच्या बाहेर काढल्या जात आहे.
हा बंद यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे अंजनगाव तालुका संयोजक अमरसिंग जावरकर रामेश्वर जावरकर ईश्वर भिलावेकर सुखराम बेठेकर रामेश्वर बेठेकर उमेश भिलावेकर रुपेश शेलुकर राजू धांडेकर रामदास धांडेकर उमेश बेलसरे अमोल हेरोळे सुशील इंगळे राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र कार्यकारी सदस्य बाबा मोहोड बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शंकरराव कौतिक्कर राजकुमार वानखडे, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेश पारवे, भारतीय बेरोजगार मोर्चाचे रवी मोहोड बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका संयोजक सिद्धार्थ पाखरे व ईतर कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]