ब्रेकिंग न्यूज  तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचे 19 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ

ब्रेकिंग न्यूज
तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांचे 19 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ

तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी केली घोषणा!

महेन्द्र भगत सह संपादक
अंजनगाव एक्सप्रेस न्यूज

महाराष्ट्र राज्यात ‘अब की बार कीसान सरकार,! चा नारा देत उदयास आलेली भारत राष्ट्र समिती चे प्रमुख व तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना शेतकऱ्यांची काळजी घेणारा मुख्यमंत्री का म्हणतात ! याचा प्रत्यक्ष आज पुन्हा त्यांच्या निर्णयातुन स्पष्ट झाले. मुख्यमंत्री केसीआर यांनी ३ ऑगस्टपासून शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असुन तेलंगणा मध्ये शेतकऱ्यांना आधीच देण्यात आलेल्या कर्जमाफी सोबतच आणखी १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रयथू बंधूप्रमाणे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम महिन्याच्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री केसीआर यांनी दिले आहेत.
तेलंगणा राज्य हे अवघ्या 9 वर्षात शेतकरी प्रगत राज्य म्हणुन निर्माण झाले त्या विपरीत महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यानं विषयी अजुनही मागास असलेले चित्र पहावयास मिळते महाराष्ट्र सरकारने आता तरी तेलंगणा राज्याची प्रेरणा व आर्दश घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना दिवसा व मोफत वीज पुरवठा करावा, शेती मालाला योग्य भाव मिळवून द्यावा व शेतकरी आत्महत्या थांबाव्यात हीच अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे शेतकरी करीत असल्याचे मुख्यमंत्री या वेळी बोलताना म्हणाले.

Spread the love
[democracy id="1"]