कुणबी समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ऋतिका धांडे हिचा अकोल्यात सत्कार

बाळासाहेब नेरकर कडून

हिवरखेड. अ.भा. कुणबी समाज मंडळ अकोला दरवर्षी अकोला जिल्ह्यातील कुणबी समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असते.या सोहळ्यात हिवरखेड येथील संत तुकाराम महाराज प्रबोधन समितीचे कार्यकर्ते लक्ष्मण धांडे यांची कन्या ऋतिका ही चिखलीच्या डी. फॉर्म कॉलेजमधून टॉपर आल्याबद्दल कुणबी समाजातील मान्यवरांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला. ऋतिका हिला सुरुवातीपासून अभ्यासाची आवड असून तिचे वडील शेतकरी आहेत व त्यांना समाजसेवेची आवड आहे. कर्मचारी भवन अकोला येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष महादेवराव कौसल होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. चंद्रशेखर बहाकर महाप्रशासक आणि शासकीय विश्वस्त मुंबई हे उपस्थित होते .यावेळी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे, अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष रामेश्वरजी फुंडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संध्या ताई वाघोडे ,सरकारी वकील फाटे साहेब, डॉक्टर सागर थोटे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रवी हेलगे प्रास्ताविक महेंद्र कराळे तर आभार प्रदर्शन किशोर मोरोकार यांनी केले.कार्यक्रमाला अखिल भाषिक कुणबी समाज मंडळाचे संचालक, आजीवन सदस्य तसेच बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]