हिंगोली तालुक्यातील भांडे गाव परिसरातून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या खासगी बसला मलकापूर
जवळ शनिवारी (ता. २९) पहाटे झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले असून २२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर मयतांचे नातेवाईक घटनास्थळी रवाना झाले आहेत.हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील शिवाजी धनाजी जगताप (५५) हे मागील पाच ते सहा वर्षांपासून दरवर्षी खाजगी बसने अमरनाथ यात्रा काढतात. त्यासाठी परिसरातील भाविकांची नोंदणी करून त्यांना यात्रेमध्ये सहभागी करून घेतले जाते. दरम्यान, मागील २२ दिवसांपूर्वी त्यांनी यात्रा काढली होती. त्यासाठी भांडेगाव, लोहगाव, जयपूर, डिग्रस कन्हाळे, साटंबा या गावातील भाविकांनी नोंदणी केली होती. सुमारे ३० भाविक या यात्रेत सहभागी झाले होते.अमरनाथ येथून दर्शन घेऊन सर्व भाविक गावाकडे परत येत होते. मात्र मलकापुर धुळे राष्ट्रीय – महामार्गावर पहाटे तीन वाजता त्यांच्या बसला नागपूर येथून नाशीककडे जाणाऱ्या एका खाजगी बसने (एमएच २७ बीएक्स- – ४४६६) समोरासमोर धडक दिली. या भिषण अपघातात भाविकांच्या बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला. पहाटे ३.०० वाजेदरम्यान मलकापुर येथे खाजगी रॉयल ट्रॉव्हल्स क्र. एम. एच २७ बी एस्क्स ४४६६ ही बस नागपुर वरुन नाशिक जात असतांना व बालाजी तिर्थयात्रा कंपनी बस क्र. चक ०८९४५८ ही बस अंबरनाथ येथून हिंगोलीकडे जात असताना दोन बसची समोरासमोर धडक झाली. झाला असुन एक प्रवासी बसमधील पाच प्रवाश्यांचा घटनास्थळी मृत्यु यांना बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मृत्यु झाला. असे एकुण ६ प्रवासी यांचा मृत्यु झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच इतर १९ प्रवाश्यांना शासकीय रुग्णालय बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.घटनास्थळी तहसिलदार मलकापूर, पोलिस विभागाचे अधिकारी / कर्मचारी व स्थानिक नागरीकांचे मदतीने तात्काळ मदत कार्य के ले. अपघात स्थळी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी भेट दिली असुन मयत प्रवासी व जखमी प्रवासी यांची नावे दुरध्वनीदवारे जिल्हाधिकारी हिंगोली व निवासी उपजिल्हाधिकारी हिंगोली यांना कळविण्यात आलेली आहे. तसेच ३१ प्रवासी यांना मलकापूर येथील गरुदवारामध्ये तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)