मानवाधिकार सहायता संघ समस्या घेवून धडकले विद्युत वितरण व नगरपालिका कार्यालयावर

मानवाधिकार सहायता संघ समस्या घेवून धडकले विद्युत वितरण व नगरपालिका कार्यालयावर

समस्यांचे निवारण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी,

अंजनगाव सुर्जी शहरातील मुख्य सर्व्हिस लाईनचे खाली लोंबकलेले विद्युत जलवाहिनीचे तार व विद्युत खांब त्वरित व्यवस्थित करण्यासाठी तसेच शहरात भेडसावणाऱ्या समस्या घेवून मानवाधिकार सहायता संघ आज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी व नगर परिषद कार्यालय येथे धडकले व शहरातील भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा अधिकाऱ्यांसमोर वाचला व त्यांना निवेदन देवून समस्या निकाली काढण्याची मागणी केली व निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने अंजनगाव सुर्जी शहरातील बऱ्याच भागातील झाडांचा वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत तारांना स्पर्श होत असल्याने,त्यात स्पार्कींग होऊन विजेचे तार जमीनीवर तुटून पडत आहेत व शहरातील बऱ्याच विद्युत मुख्य सर्व्हिस लाईन चे तार हे खाली लोंबकळत आहेत तसेच काही ठिकाणचे विद्युत खांब हे वाकलेले आहे त्यामुळे नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. हे तार व खांब लवकर व्यवस्थित करण्यात यावे यासाठी मानवाधिकार सहायता संघाने महावितरण उपअभियंता यांना निवेदन दिले.तसेच दुसरे निवेदन हे नगर परिषद कार्यालय यांना देण्यात आले असून नगरात भेडसावणाऱ्या समस्यांबाबत अंजनगाव सुर्जी शहरातील आठवडी बाजार ते सुर्जीकडे जाणाऱ्या नवीन पुलाचे बांधकाम एक वर्षापासून झाले असून ह्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या रस्त्याची स्थिती ही खूपच बिकट झालेली आहे.पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता खराब झाला असून तेथे पावसाच्या पाण्यामुळे मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहे,यामुळे नागरिकांना जाण्या-येण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या खड्यांमुळे दररोज दुचाकीचालक व पादचा-यांचे किरकोळ अपघात होत आहे.या सर्व नागरिकांच्या तक्रारी व समस्यांची दखल घेत मानवाधिकार सहायता संघ अंजनगाव सुर्जी यांच्या वतीने मुख्याधिकारी नगरपालिका अंजनगाव सुर्जी यांना निवेदनद्वारे मागणी करण्यात आली की, आपण ह्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करुन व या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करावे,जेणे करून नागरिकांची भविष्यात होणाऱ्या अपघातातून जीवितहानी होणार नाही, दोन्हीं निवेदनाची दखल न घेतल्यास नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.निवेदन देतेवेळी मानवाधिकार सहायता संघाचे प्रमुख सुनिल माकोडे,तालुका अध्यक्ष महेंद्र भगत,तालुका कार्यकारी अध्यक्ष सुधाकर टिपरे,महासचिव सचिन इंगळे,तालुका उपाध्यक्ष पंकज हिरुळकर,सदस्य श्रीकांत धुमाळे,मुन्ना ईसोकार,राजु गिरी,संजय धारस्कर, दिलीप काळे,संगीता मेन,प्रतीक्षा काकडे,सुरेखा धमाले,जोती निमकार, निता मोगरे सहीत नागरीक प्रामुख्याने उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]