आठवडी बाजार ते सुर्जी कडे जाणा-या नवीन तयार झालेल्या पुलाच्या अलिकडचा व पलीकडचा रस्ता दुरूस्त करा

आठवडी बाजार ते सुर्जी कडे जाणा-या नवीन तयार झालेल्या पुलाच्या अलिकडचा व पलीकडचा रस्ता दुरूस्त करा

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:

अंजनगाव सुर्जी शहरातील आठवडी बाजार ते सुर्जीकडे जाणाऱ्या नवीन पुलाचे बांधकाम एक वर्षापासून झाले असून ह्या पुलाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या रस्त्याची स्थिती ही खूपच बिकट झालेली आहे.पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता खराब झाला असून त्यामध्ये अपघात होत आहे, तसेच या रस्त्यावर खड्डे पडले असून नागरिकांना जाण्या-येण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे मानवाधिकार सहायता संघ यांच्या वतीने नम्र निवेदन देऊन आपण हया प्रश्नांवर गांभीर्याने विचार करून या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करावे,जेणे करून नागरिकांची भविष्यात होणाऱ्या अपघातातूनजीवितहानी होणार नाही .जर हया प्रश्नावर आठ दिवसांत तोडगा काढण्यात आला नाही तर नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल. निवेदन देतेवेळी मानवाधिकार सहायता संघाचे तालुका अध्यक्ष महेंद्र भगत, शहर अध्यक्ष सुनील माकोडे, तालुका कार्यकारी अध्यक्ष सुधाकर टिपरे, महासचिव सचिन इंगळे, तालुका उपाध्यक्ष पंकज हिरुळकर, श्रीकांत धुमाळे, मुन्ना ईसोकार, राजु गिरी, संजय धारस्कर, संगीता मेन प्रतीक्षा काकडे,सुरेखा धमाले, जोती निमकार, निता मोगरे सहीत नागरीक उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]