अखेर शासनाने केली हिवरखेड नगरपरिषद ची घोषणा

अखेर शासनाने केली हिवरखेड नगरपरिषद ची घोषणा

आ. मिटकरी यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद

गावकऱ्यांच्या 23 वर्षांपासूनच्या संघर्षाला यश

धिरज बजाज हिवरखेड :-
शासनाने अखेर बहुप्रतिक्षित हिवरखेड नगरपरिषदेची घोषणा केली असून हिवरखेड येथे नगरपंचायत अथवा नगरपरिषद व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून निरंतर प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या जागरूक नागरिकांसह संपूर्ण हिवरखेड वासियांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

आमदार अमोल मिटकरी यांच्या अथक प्रयत्नातून नगरपंचायतच्या झालेल्या उदघाषनेवर काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी जाणीवपूर्वक अन्यायकारक स्थगिती आणल्यामुळे हिवरखेड वासियांमध्ये तीव्र असंतोष सुद्धा खदखदत होता. आडकाठी आणणाऱ्यांची सर्वत्र नाचक्की झाली होती. नगरपंचायत वर स्थगिती आणल्या बाबत गावातील नागरिकांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडे जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद करून दाखवतो असे आश्वासन आमदार भारसाकळे यांनी दिले होते. त्यानंतर आमदार भारसाकळे यांनी नगरपरिषद करण्याचे पत्र सुद्धा शासनाला दिले होते.
अकोला जिल्ह्यातील हिवरखेड ग्रामपंचायत चे नगरपरिषद मध्ये रूपांतर करण्याचा अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव अनेक दिवसांपूर्वीच नगर विकास मंत्रालयात धडकला होता त्यामुळे शासनाच्या अधिसूचनेकडे जनतेचे लक्ष लागले होते. परंतु तरीसुद्धा नगरपरिषद ची घोषणा होत नसल्यामुळे नागरिकांच्या मनात पुन्हा संशय बळावला होता. परंतु आमदार अमोल मिटकरी यांनी 26 जुलै रोजी विधानमंडळात प्रश्न उचलतात मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात नगर परिषद करणार असल्याचे सांगितले आणि थोड्याच वेळात शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिवरखेड नगरपरिषदची अधिसूचना काढत प्राथमिक उद्घोषणा केली. त्यामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नगरपरिषद ची उद्घोषणा होताच सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व सर्व सामान्य नागरिकांनी आतिश बाजी करून मिठाई वाटून जल्लोषात या घोषणेचे स्वागत केले.
प्राथमिक उद्घोषणा झाल्यावर नगरपंचायत प्रमाणेच नगरपरिषदेसाठी सुद्धा आक्षेप व हरकती बोलाविल्या जाणार आहेत. येथे उल्लेखनीय आहे की मागील वेळी अनेक जणांनी आक्षेप हरकती दाखल केल्या होत्या. त्या सर्व हरकती जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळल्या होत्या.

 

*विविध स्तरातून 23 वर्षांपासून प्रयत्न*
नागरी क्षेत्र घोषित करण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनी अनेकदा विधिमंडळात आवाज उचलला होता. नागरिकांनी स्थगितीबाबत नाराजी व्यक्त केल्यावर आमदार भारसाकळे यांनी नगरपरिषद साठी उपमुख्यमंत्री व शासनाला पत्र दिले होते. माजी पालकमंत्री बच्चुभाऊ कडू, प्रहार प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी सुद्धा पुरेपूर प्रयत्न केले होते. तत्पूर्वी मागील अनेक वर्षांपासून यासाठी संघर्ष सुरू असून अर्जुन खिरोडकार या पत्रकाराने व माजी सरपंच रामेश्वर शिंगणे, गटनेता रवी घुंगड यांनी उपोषणे केली होती. विविध आंदोलने झाली. प्रदर्शने निदर्शने झाली. पत्रकार संघाच्या पुढाकारातून अनेक नागरिकांनी रक्तदान करून आपल्या रक्ताने शासनाला पत्र लिहिली होती. सामाजिक कार्यकर्ता धीरज बजाज यांनी शासनाकडे इच्छा मृत्यूची परवानगी मागितली होती. ग्रामपंचायत चे अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसभांचे व मासिक सभांचे ठराव घेणे, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, हिवरखेड विकास मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, लोकजागर मंच, आदर्श पत्रकार संघ, समस्त व्यापारी संघटना, शेतकरी बांधव, जागरूक आणि विकासप्रेमी नागरिकांनी, विविध लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते, आणि विविध संघटनांनी आणि सर्व वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी कर्मचारी इत्यादीनी निरंतर पाठपुरावा सुरूच ठेवला होता. सर्वांच्या सामूहिक संघर्षाला अखेर यश आले.

Spread the love
[democracy id="1"]