राज्यातील पत्रकारांच्या मागण्या पूर्ण करा आमदार बळवंत वानखडे यांची औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात मागणी

राज्यातील पत्रकारांच्या मागण्या पूर्ण करा

आमदार बळवंत वानखडे यांची औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात मागणी

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी अंजनगाव एक्सप्रेस न्यूज सह संपादक :

भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून नेहमीच पत्रकारांना विशेष बहुमान आहे. ऊन , वारा , पाऊस , वादळ कशाचीही पर्वा न करता राज्यातील दैनिक , साप्ताहिक , टीव्ही माध्यम , व डिजिटल माध्यमाचे पत्रकार शासन प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न साधतात. वेळोवेळी सामान्य नागरिकांवर होणारे अन्याय तसेच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न पत्रकार बंधू करतात

राज्यात नोंदणीकृत पत्रकारांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्याची संख्या जवळपास ९ हजारांच्या आसपास आहे. अतिशय काम करीत असताना त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न प्रामुख्याने निर्माण झाला आहे. मुलांच्या शिक्षणाचा , कुटुंबाचा पालनपोषणाचा महत्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. पत्रकारांना आर्थिक धैर्य मिळावे म्हणून पत्रकारितेसोबत त्यांना जोडधंद्याची सांगड असावी म्हणून राष्ट्रीयकृत बँकेकडे बहुतांश पत्रकारांनी कर्ज काढण्यासाठी अर्ज केले आहेत परंतु फक्त पत्रकार असल्याने त्यांना बँकांमार्फत कर्जापासून वंचित ठेवले जात आहे. यामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये असुरक्षितेतेची भावना निर्माण झाली आहे. पत्रकारांच्या या महत्वाच्या मुद्यावर दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बळवंत वानखडे यांनी औचित्याचा मुद्दा या संसदीय आयुधातून पावसाळी अधिवेशन २०२३ मध्ये मुद्दा उपस्थित केला.

तसेच राज्यातील विविध विकास महामंडळाच्या धर्तीवर पत्रकारांच्या कल्याणासाठी पत्रकार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली.

Spread the love
[democracy id="1"]