प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चे रुग्णालय उपलब्ध करून द्या
संघरतन सरदार
तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संघरतन सरदार यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डोंगरे यांना निवेदनात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चे रुग्णालय आपल्या अंजनगाव सुर्जी तालुका सोडून जवळपास महाराष्ट्र भर व अनेक ठिकाणी रुग्णालय अस्तित्वात व रुग्णांच्या मदतीत सुरू आहे. रुग्ण बरे होऊन योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेताना दिसत आहे. पण अंजनगाव सुर्जी तालुक्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्याचे रुग्णालय नसल्याने सर्व सामान्य गोरगरीब जनतेला मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. खाजगी दवाखाना व हॉस्पिटलमध्ये रुग्णांसोबत पैशांची लूट होताना दिसत आहे. साधारणता टायफाईड, मलेरिया, पेशी, निमोनिया, असंख्य किरकोळ सर्दी, ताप, खोकला आजारासाठी औषध उपचार घेण्याकरिता गोरगरीब जनतेजवळ पुरेसे पैसे नसल्याने जीवितास खेळावा लागत आहे. उढार पाजार कर्ज घेऊन आजारापासून बरे होण्याकरिता कसरत करावी लागत आहे. तालुक्यात जर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्याचे रुग्णालय उपलब्ध करून दिल्यास गोरगरीब जनतेला या योजने अंतर्गत मोफत उपचारासाठी सोय होणार आहे. तरी आपण आपल्या स्तरावरून तातडीने लक्ष घालून रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय उपलब्ध करून द्याल.अशी मागणी निवेदनात केली आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)