परिवहन समिती सभेचे आयोजन
दिनाक 25 जुलै 2023 रोजी स्थानिक शिवाजी आयडियल इंग्लिश, अमरावती येथे दुसरी परिवहन समिती सभा आयोजित करण्यात आली. ही सभा शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच परीवहन सभेच्या सभाध्यक्ष सौ. वैशाली ठाकरे , सभेचे अध्यक्ष श्री. सतीशजी काळे, सचिव सौरभ काळमेघ , पय
पर्यवेक्षिका सौ. शारदा फुले तसेच संपूर्ण समिती सदस्य उपस्थित होते. या सभेदरम्यान संपूर्ण वाहनचालकांना विद्यार्थ्यांना वाहतुकि दरम्यान येणाऱ्या अडचणी, विद्यार्थी संख्या,वाहन परवाना, इन्शुरन्स, फिटनेस प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांच्या नावांच्या याद्या , आर . सी बुक, आधार कार्ड, इत्यादी शाळेला जमा करण्यास सांगण्यात आले. वाहनचा वेग , प्रथमोचाराची पेटी, अग्निशामक तसेच क्षेत्रिय परिवहन कार्यालय यांचे मार्फत येणाऱ्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्याची वाहतुकी दरम्यान दक्षता घेण्यात यावी इत्यादी संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे मार्फत आव्हाहन करण्यात आले. संपूर्ण समितीच्या उपस्थिती मध्ये सभा यशस्वीरीत्या पार पडली.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)