हिवरखेड गावात जोरदार पाऊस झाल्याने परीसरात मुख्य ठिकाणी मार्गच बंद झाला,

हिवरखेड परीसर जलमय,

हिवरखेड गावात जोरदार पाऊस झाल्याने परीसरात मुख्य ठिकाणी मार्गच बंद झाला,

हिवरखेड जि, प शाळेत संपूर्ण पाणीच पाणी झाले त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना जाणे कठीण झाले होते, अंगणवाडी परिसरात पाणीच पाणी झाल्याने चिमुकल्यानच्या पोषण आहार पाण्याने ओलाचिंब झाला होता,तेथील अंगणवाडी सेविका मंदतनिस यांनी सावरा सावरी केल्याने आहार सुरक्षित ठेवण्यात आला, लेंडी नाल्याला मोठा पूर आल्याने काही वेळ गावातील व वार्ड क्र २ मधील संपर्क तुटला होता, तर वार्ड क्र २ मध्ये संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते, तसेच परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरले होते, अनेक शेतात पाणी शिरले, बऱ्याच ठिकाणी या पाण्यातमूळे नुकसान सुद्धा झाले, ज्या रहिवाशांनचे व शेतकऱ्यांनचें नुकसान झाले,त्यांच्या नुकसानाचे पंचनामें करून संबधित तलाठी विभागानि वरिष्ठांनकडून मदत घोषित करावी अशी मागणी नुकसानधारकांनि केली, तसेच बऱ्याच वेळ हिवरखेड आकोट व हिवरखेड तेल्हारा मार्गाचा संपर्क तुटला होता, हिवरखेड तेल्हारा मार्गावर नवीन पुलावरून जाणे कठीण झाले होते, तर हिवरखेड आकोट मार्गावर वृक्ष कोसळले होते व पुलावरून पाणी जात होते,त्यामुळे हे महत्वपूर्ण दोन्ही मार्ग बंद पडले होते, या दोन्ही मार्गावरील पूले हे उंचीने वर मजबूत पाहिजेत अशी मागणी प्रवाशी वर्ग करीत आहेत,

छाया, अर्जुन खिरोडकार हिवरखेड

Spread the love
[democracy id="1"]