ज्ञानाच्या ईश्वराची अक्षर मूर्ती ज्ञानेश्वरी. श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.

ज्ञानाच्या ईश्वराची अक्षर मूर्ती ज्ञानेश्वरी.
श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.

प्रतिनिधी-बाळासाहेब नेरकर कडून

विज्ञान युगाच्या नावा खाली ईश्वराच्या अस्तित्वा बाबत अनेक मतप्रवाह व वाद सद्यस्थितीमध्ये मोठमोठाल्या व्यक्ति मत्त्वांच्या माध्यमातून भाषण , विचार , व्यक्ति व लेखन स्वातंत्र्याच्या घटनादत्त अधिकारामुळे मोठ्या चवीने चर्चिल्या जात आहेत . प्रत्येक जण स्वतःच्या बुद्धीकौशल्य द्वारा आपापला पक्ष जनतेच्या न्यायालयामध्ये लेखणी व वाणीच्या माध्य मातून मांडत आहेत . त्यामुळे बरेचदा सर्व सामान्य जनतेचा बुद्धिभेद होतो . परंतु ईश्वराच्या अस्तित्वाचा निर्णय मात्र अपूर्णच राहतो . ईश्वर जीवाचा उद्धार करतो याबाबतीत जरी मत मतांतरे असली तरी ;
ज्ञानाच्या माध्यमातून मात्र प्रत्येक मानवाचा ऐहिक व पारलौकिक कल्याण होते हे सर्व मान्य आहे .त्यातही पुन्हा नेमके कोणते ज्ञान याबाबत अजून एक वाक्यता जरी झाली
नसली , तरी यावद् भू तलावरील सर्वधर्मीय मनुष्यत्रांचा उद्धारक असणाऱ्या आत्मज्ञानाच्या ईश्वराची अक्षरमूर्ती ग्रंथराज ज्ञानेश्वरी
असल्याचे अभ्यासपूर्ण मत ज्ञानेश्वरीचे निष्ठावंत उपासक श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी व्यक्त केले.ते आज संत श्री वासुदेव जी महाराज स्मृती मंदिर ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी भाव निरूपण सप्ताहातील दुसरे पुष्प गुफींत असताना बोलत होते. पुढे म्हणाले की ! साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र l पै संसारु जिणतें हें शस्त्र l आत्मा अवतरविते मंत्र l अक्षरें इयें ll
अर्थातच गीता हे शास्त्र खरोखरच नुसते शब्द पांडित्याचे नसून , गीता ही संसार जिंकण्याचे शस्त्र आहे .फार काय सांगायचे या गीतीची पर्यायाने ग्रंथराज ज्ञानेश्वरीची अक्षरे आत्म्याला प्रगट करणारी मंत्र आहेत . म्हणून या ओव्यांची मंत्र म्हणून साधना जर साधकांनी केली तर मंत्रजपाचे पूर्ण फल साधकाच्या पदरात हमखास पडल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला असे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक तिलक हे कळवितात.

Spread the love
[democracy id="1"]