बी आर एस हाच महाराष्ट्राला सक्षम पर्याय. माणिकराव कदम यांचे प्रतिपादन

बी आर एस हाच महाराष्ट्राला सक्षम पर्याय.
माणिकराव कदम यांचे प्रतिपादन

बाळासाहेब नेरकर कडून

अकोला महाराष्ट्रामध्ये सध्या अत्यंत गलिच्छ राजकारण होत असून सर्वसामान्य जनता विकासापासून कोसो दूर आहे परंतु तेलंगणासारखे राज्यामध्ये सर्व सामान्य व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळत आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज मोफत पाणी तसेच अनुसूचित जातीच्या लोकांना व्यवसाय करिता अनुदान शेतकऱ्यांच्या मुलीचा खर्च राज्य शासन उचलत यापेक्षाही अनेक योजना त्या ठिकाणी उत्कृष्टपणे राबवल्या जात आहेत परंतु महाराष्ट्रात मात्र दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि आताची राजकीय परिस्थिती पाहता सामान्य जनता कंटाळलेली आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला बी आर एस एस हाच सक्षम पर्याय देऊ शकतो असे प्रतिपादन बी आर एस चे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांनी केले ते अकोला जिल्हा बैठकीमध्ये बोलत होते यावेळी त्यांच्यासमवेत विदर्भ समन्वयक निखिल देशमुख युवा आघाडीचे समन्वयक सुधीर बिंदू जेष्ठ सामाजिक सामाजिक व्यक्तिमत्व बाबासाहेब देशमुख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा बी आर एस पक्षांमध्ये प्रवेश घेण्यात आला त्यामध्ये बारा बलुतेदार संघटनेचे उपाध्यक्ष अक्षय चहाकर व्यावसायिक निलेश देशमुख योगेश ठोसरे सोहेल इब्राहिम वधु वर परिचय मंडळाचे अध्यक्ष शिरसाट साहेब योगिता रामकृष्ण वैराळे मनोहर पेठकर इशरत जागीरदार शेख राजिक शेख आजाद नजमा सुलताना अब्दुल समदआदींनी पक्ष प्रवेश घेतला सदर बैठकीमध्ये विदर्भ समन्वयक निखिल देशमुख यांनी बी आर एस पक्षाची विस्तृत माहिती दिली यावेळी सुधीर बिंदू बाबासाहेब देशमुख दत्ता देशमुख यांची समायोजित मार्गदर्शन झाले
यावेळी राष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये निवड झाल्याबद्दल कुमारी साक्षी माळी व तिचे प्रशिक्षक सौरभ खंडारे पैलवान यांचा प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच युवकांना राजकीय क्षेत्रामध्ये येण्यासाठी कार्यशाळा राबवणारे कोमल अकाल यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आर एस चे जिल्हा समन्वयक सोशल मीडिया प्रशांत भटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अकोला पूर्वे चे समन्वयक गजानन हरणे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत राष्ट्र समितीचे प्रशांत भटकर गजानन हरणे शंकरराव कवर अक्षय नन्नावर आकाश हेरोळे मुर्तीजापुरचे बोन गिरे आदींनी परिश्रम घेतले यावेळी मंजू बगाडे रेखा मानकर उर्मिला माळी फिरोज खान अतिक कुरेशी दानिश शहा शेख अदनान शेख सोहेल रितेश शुक्ला सतीश इंगळे यांच्या समवेत शेकडो पदाधिकारी उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]