अकोला जिल्हा मद्ये..पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 12 रोजी 216 पदांसाठी भरती प्रक्रिया.
अकोला,दि.7 .. पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बुधवार दि. 12 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात 216 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पात्रताधारक इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.
मेळाव्यात सहभागी उद्योजक याप्रमाणे-
1. क्रेडिट अॅक्सेस ग्रामिण लि. अकोला. 2. अॅबेल इलेक्ट्रो सॉफ्ट टेक्नोलॉजी प्रा.लि. अकोला 3. सनसाईन इंजिनिअरिंग अकोला. 4. नवकिसान बायोप्लान्टीक लि. नागपूर 5. टॅलेनसेतू सर्व्हिस प्रा. लि. पुणे. 6. पिपल ट्री वेंन्चर प्रा.लि. पुणे येथे एकूण 216 पदाकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. हा रोजगार मेळावा बुधवार दि. 12 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)