राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडीनंतर प्रथमच यशोमती ताई सह बळवंत भाऊ वानखडे शरद पवारांच्या भेटीला

राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडीनंतर प्रथमच आज राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा

मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांची मुंबई येथे काँग्रेस पक्षाची बैठ आटोपल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह भेट घेतली. आजही पवार साहेबांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य एक वेगळीच ऊर्जा देते. या कठीण काळात सुध्दा ८४ वर्षाचा योद्धा अतिशय संयमाने सर्व गोष्टींना सामोरे जात आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते मा. बाळासाहेब थोरात , आमदार यशोमातीताई ठाकूर , आमदार बळवंतभाऊ वानखडे, आमदार विश्वजितजी कदम , महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]