बुलडाण्याजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू ८ जण जखमी

बुलडाण्याजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
८ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : मृत्यूचा सापळा ठरलेल्या समृद्धी महामार्गावर अपघात दैनंदिन बाब झाली आहे. शुक्रवारी २ अपघातानंतर शनिवारी पहाटे समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्याजवळ सिंदखेडराजा परिसरात विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसच्या भीषण अपघातात २५ जण ठार तर ८ जण जखमी झाले.
चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायरला धडकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करीत होते. बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायरला धडकली आणि रस्त्यावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, क्षणार्धात बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला. भीषण अपघातात बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काही प्रवासी जखमी आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.

Spread the love
[democracy id="1"]