स्मार्ट कॉटन अंतर्गत शेतकऱ्यांना खरिब हंगाम पूर्व प्रशिक्षण

स्मार्ट कॉटन अंतर्गत शेतकऱ्यांना खरिब हंगाम पूर्व प्रशिक्षण

कृषी विज्ञान केंद्र अकोला कुलदीप देशमुख यांचे शेतकऱ्यांना मार्गेदर्शन

संजय गवळी अकोट तालुका प्रतिनीधी

आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनात वाढ करून समृद्धी साधावी. आपल्या शेतीत पारंपरिक पद्धत सोडून आधुनिकतेची कास धरल्यास उत्पन्नात वाढ होईल. शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे उत्पन्न व उत्पादन वाढवावे. यासाठी कृषी विभाग सदैव शेतकऱ्यांना मदत करण्यास तयार आहे कृषी विज्ञान केंद्र अकोला कुलदीप देशमुख यांनी केले आहे.

अकोट तालुक्यातील पळसोद येथील ग्रामपंचायत सभागृहात दिनांक २५ जून रोजी खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी त्यांनी कापूस पिकाची लागवड तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान तसेच लागवडीबद्दल विस्तृत माहिती दिली.

या वेळी कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र अकोला चे देशमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,तसेच मंडळ अधिकारी धुमाळे,कृषी पर्यवेक्षक फोकमारे,कृषी सहाय्यक भांड व गावातील शेतकरी वर्ग उपस्थित होते .

Spread the love
[democracy id="1"]