श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योगोत्सव
भारताने जगात योगाचा प्रचार व प्रसार केला, त्याच अनुषंगाने संपूर्ण जगाला 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याकरिता प्रेरित केले. आणि मागील काही काळात संपूर्ण विश्वात कोरोना महामारीने थैमान घातले असताना , या महामारीपासून वाचण्याकरिता आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग व प्राणायामाचे महत्व अधोरेखित झाले आहे.त्यामुळे श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले. याकरिता योग प्रशिक्षक प्रा. विश्वास जाधव यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशांक देशमुख यांच्या उपस्थितीत योग व प्राणायाम प्रात्यक्षिक करून दाखविले.
महाविद्यालयाच्या टेरेसवर आयोजित या कार्यक्रमात श्री. विश्वास जाधव यांनी ताडासन, अर्धचक्रासन,त्रिकोनासन,
पादहस्तासन.वृक्षासन, पद्मासन,अर्धमच्चीन्द्र आसन, पश्चिम उत्तनासन, गोमुखासन, वज्रासन,शवासन, उत्तान पादासन,सर्वांगासन, पवन मुक्तासन,मकरासन,भुजंगासन,धनुरासन, शलाभासन, अनुलोम, विलोम,कपालभाती, भ्रामरी,शितकारी, शितली प्राणायाम, तसेच हास्य योग व शीर्षासन, मयूर आसन आणि हलासन इत्यादींचे प्रात्यक्षिक दाखवून करून घेतले. ह्या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. दिनेश देशमुख, यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)