जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायदा धाब्यावर अंजनगाव एक्सप्रेस या पोर्टल वर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन कायदा धाब्यावर

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका विशेष प्रतिनिधी

शहानुर नदीत आढळला जैविक वैद्यकीय कचरा” या मथळ्याखाली १३ जून रोजी अंजनगाव एक्सप्रेस या पोर्टल वर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.त्यासंबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर डोंगरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल नालट,नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी शहानूर नदी पात्राची पाहणी केली असता हिंदू स्मशान भूमी-लाला चौक रोड शासकीय रुग्णालया च्या मागच्या दरवाजाच्या बाजुला शहानूर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात इंजेक्शन बॉटल व घातक टाकाऊ वस्तू आढळून आल्या. मानवी निदान,उपचार किंवा लसीकरणादरम्यान या नियमांनुसार जैव-वैद्यकीय कचरा (BMW)निर्मिती,संकलन,रिसेप्शन,स्टोरेज,वाहतूक,उपचार,प्रक्रिया, विल्हेवाट किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या हाताळणीसाठी “अधिकृतता” जैविक वैद्यकीय कचरा नियमांतर्गत अधिकृतता आवश्यक आहे.परंतु त्यासंबंधी नियमाची अंमलबजावणी होताना दिसत नसून नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.
अंजनगाव सुर्जी मधून वाहणारी शहानुर नदीच्या पात्रात जैविक वैद्यकीय कचरा,शहरातील सांडपाणी आणि त्यात साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर कचरा,प्लास्टिक पिशव्या,प्लास्टिक पोते आढळले असून आता तर नागरिकांना नियम शिकविणारे अधिकारी,जीव वाचविणारे देवदूतच नागरिकांच्या जीवावर उठले असून शहानूर नदी मृत झाल्याचे नदी पात्रात टाकलेल्या जैविक वैद्यकीय कचऱ्या निदर्शनास येते.त्यामुळे अंजनगाव सुर्जी शहरातील प्रत्येक नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असून नियमांचे उल्लंघन करून नियम शिकविणाऱ्या डॉक्टरांवर शासन कारवाई करणार का? की शासनाने फक्त सामान्य नागरिकांना भीती दाखवण्या पुरतेच नियम बनविलेले आहेत? या गंभीर बाबी संदर्भात जातीने लक्ष घालून संबंधित शासनाकडून कारवाईची अपेक्षा मात्र प्रतीक्षेत असून कागदोपत्रीच कारवाई होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

सदर जैविक वैद्यकीय कचरा हा शासकीय रुग्णालय येथील नसून शासकीय रुग्णालयामध्ये जैविक कचरा व्यवस्थापन केंद्र उपलब्ध आहे.खाजगी रुग्णालयांपैकी केलेला हा खोडसाळपणा दिसत असून सर्व खाजगी रुग्णालयाची तपासणी तसेच चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
– डॉ.अमोल नालट ,वैद्यकीय अधिकारी ग्रामीन रुग्णालय

शहानुर नदीपात्रात जैविक वैद्यकीय कचरा आढळल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले.परंतु वैद्यकीय कचरा शासकीय नसून वेळ आणि तारखेनुसार आम्ही तपासणी केल्याची आमच्याकडे नोंद केली आहे.सीओ साहेबांनी त्यांची टीम (आरोग्य विभाग) तपासणी करिता पाठविली आहे.पुढील नियमानुसार योग्य कार्यवाही आम्ही करणार आहोत.
– डॉ.सुधीर डोंगरे तालुका वैद्यकीय अधिकारी

आरोग्य विभाकडून मौका चौकशी करून अहवाल मागविला आहे.त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.
– प्रशांत उरकुडे मुख्याधिकारी न.प.कार्यालय

Spread the love
[democracy id="1"]