यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कृषी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्रात नियमित कृषी शिक्षण घेऊ न शकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकद्वारा कृषी व उद्यानविद्या विषयात विविध प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम राबविले जातात. यावर्षी म्हणजे सन 2023-24 करिताचे प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यानुसार प्रथम प्रवेश अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने 13 ते 19 जून 2023 या दरम्यान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन भरावयाचे आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी दि.26 जुन रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 27 जून ते 02 जुलै ला प्रथम गुणवत्ता यादी प्रवेश फेरीचे प्रवेश होणार आहे. दुसरी गुणवत्ता यादी 07 जुलै ला प्रसिद्ध होणार असून त्याचे प्रवेश दि.7 ते 11 जुलै दरम्यान होतील.17 ते 18 जुलै दरम्यान शिल्लक राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश देण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसंबंधी विद्यार्थ्यांनी अधिक महितीकरिता मुक्त कृषी केंद्र,श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय,शिवाजी नगर, अमरावती च्या केंद्र संयोजिका प्रा. कल्पना पाटील, मो.नं. 9403116029 व केंद्र सहाय्यक श्री. विशाल अढाऊ,मो.नं. 9960736379 या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन केंद्र प्रमुख डॉ.शशांक देशमुख यांनी केले आहे.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)