दहावीच्या परीक्षेत कैवल्य विवेक भगत 97.20% तर गार्गी संजीव वानखडे 97.40 % गुण
सेंटमेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका विशेष प्रतिनिधी:
दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मोठया प्रमाणात विद्यार्थ्यानी यश संपादन केले असुन अंजनगाव सुर्जी येथील सेंटमेरी इंग्लिश मीडियम स्कूल चे विध्यार्थी कैवल्य विवेक भगत याने 97.20% तर विद्यार्थीनी गार्गी संजीव वानखडे हिने 97.40 % गुण घेत यश संपादन केले. कैवल्य चे वडील विवेक भगत हे शिक्षक आहेत तर आई अंजली विवेक भगत ही वकील आहे तर गार्गीचे आई-वडील संजीव उत्तमराव वानखडे शिक्षक,सुप्रिया संजीव वानखडे शिक्षिका आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी सर्वच विषयात प्राविण्य मिळविले असुन सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे आपल्या यशाचे श्रेय या विद्यार्थ्यांनी आई-वडील व शिक्षकांना दिले आहे.