मुऱ्हा देवी येथे जुगार अड्ड्यावर धाड लाखो रुपयांचा ऐवज जप्त अमरावती गुन्हे शाखा, रहिमापुर चिंचोली पोलिसांची कारवाई

मुऱ्हा देवी येथे जुगार अड्ड्यावर धाड लाखो रुपयांचा ऐवज जप्त अमरावती गुन्हे शाखा, रहिमापुर चिंचोली पोलिसांची कारवाई

 

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका विशेष प्रतिनिधी:

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील. रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशन अंतर्गत मुऱ्हा देवी या गावात मोमीन शेख कादिर राहणार मुऱ्हा देवी यांच्या घरात जुगार खेळताना 26 लोकांना 9 लाख 14 हजार 40 रुपयांच्या मालासह अटक करण्यात आली त्यामध्ये 19 मोबाईल 11 मोटरसायकल चा मुद्देमालात समावेश आहे. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी नायडू यांचे नेतृत्वात करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की, रहिमापूर चिंचोली पोलीस स्टेशन अंतर्गत मुऱ्हा गावात एका घरात जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमरावती यांना प्राप्त झाली होती गोपनीय माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी सापळा रचुन काल रात्री या घरावर धाड टाकली त्यामध्ये अंजनगाव सुर्जी येथील गोपाल किसन अस्वार अंजनगाव सुर्जी उमेश महादेव थोरात कसबे गव्हाण, माधव उर्फ गजानन, अशोक गोळे हंतोडा,सतीश किशन शेळके येवदा, राहुल प्रल्हाद खानापुरे अंजनगाव सुर्जी
दिनेश गणेश लव्हाळे कापूसतळणी, नंदकिशोर मोतीराम करडे, रामगाव, सुमित मधुकर खांडेकर हसनापूर, मुक्तार अली, लियाकत अली, अंजनगाव सुर्जी, देविदास काशीराम पातोंड वनोजा,भूषण विजय देशमुख अंजनगाव सुर्जी, निलेश ओंकार माकोडे अंजनगाव सुर्जी, अरुण देवराव कुकडे अंजनगाव सुर्जी निवृत्ती पंजाबराव मिसाळ, हायापुर, श्रीकृष्ण अंबादास नवले, अंजनगाव, अंकुश प्रमोद शेळके येवदा, दिनेश पुरुषोत्तम गायकवाड कसबेगव्हाण, मोहम्मद इजाज मोहम्मद अयाज कापुसतळणी, फयमोदिन शर्मुफोद्दीन कापूसतळणी, अनिल जानराव सरदार चिंचोली विनोद प्रभाकर धमाले अंजनगाव, रुपेश रमेश मोरे अंजनगाव, प्रशांत दुर्योधन मुरकुटे अंजनगाव, मोहम्मद साबीर शेख बशीर राहणार मुरहा देवी हा फरार आरोपी एकूण 26 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे
त्यापैकी एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे ही सर्वात मोठी कारवाई असून बऱ्याच दिवसापासून इथे जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून समजली
ही कारवाई पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी , उप पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक मनोहर ,रहिमापूर चिंचोलीचे पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, व पो. कॉ.सुनील महात्मे, ना. पो. कॉ. निलेश डांगोरे, पो. कॉ. अमोल केंद्रे, दिनेश राठोड, सहायक पोलीस उपनिरीक्षक, बाबुराव लुटे पो.हे.कॉ. गजानन शेरे यांनी कारवाई पार पडली त्यामुळे जुवा खेळणार याचे धाबे धनानले आहेत, पुढील घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Spread the love
[democracy id="1"]