हिवरखेड मध्यें चोरीच्या घटनेत वाढ ,
मात्र संबधित पोलिसांचे लक्ष असूनही दुर्लक्ष,
तेल्हारा प्रतिनिधी,अर्जुन खिरोडकार
हिवरखेड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पासून चोरीच्या घटना घडत असून या काही दिवसात या घटनेमध्ये वाढ झाली असल्याचे चित्र हिवरखेड मध्ये पाहण्यास मिळत आहे,एकाच रात्री मेंनरोडवरील सीसीटीव्ही केमॅरे खालील सोने चांदीची दुकाने फुटतात पोलिसांचा तपास मात्र थंड अवस्थेत आरोपी अजूनही मोकाटच राहतात, अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य दिन दिन दहाळे चोरटे चोरून नेतात, पोलीसात शेतकरी तक्रारी देतात, परंतु ह्या तक्रारी फक्त धूळ खात आहेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांनि तक्रारी देने कमी केल्याचे दिसून येते,माञ चोरांनी त्याचे काम नाही सोडले, या आठवड्यात एक मोटरसायकल चोरीला गेली,तर वार्ड क्र,२ मध्ये सेन्ट्रीग,पाण्याची टाकी , मोबाईल, पेट्रोल ,एवढेच नाहीतर पोलीस स्टेशनच्या अगदी नाकाजवळ ५००० लिटरची पाण्याची मोठी टाकी चोरीला जाण्याची घटना घडते आणि पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही मध्ये कैद होत नाही, तसेच कित्येक दिवसापासून चोरीला गेलेला एका शेतकऱ्यांचा कापूस कपाशी पिका करिता तो शेतकरी न्याय मागतो त्याला न्याय मिळत नाही, पोलीस स्टेशन अंतर्गत बऱ्याच खेड्या पाड्यातील शेतकऱ्यांनची गुरे ढोरे, चोरीला गेली अजूनही त्या गुरांचा पत्ता नाही, आणखी बऱ्याच चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ वाढतच आहे, पोलीस मात्र फक्त त्यांचा स्वार्थ साधत असल्याचे त्रस्त नागरिक बोलत आहेत, ह्या चोरीच्या घटनाना लगाम लावण्यासाठी व चोराचे मुस्के आवरण्यासाठी वरिष्ठ पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे,
,प्रतिक्रिया,
आमच्या शेतकऱ्यांनच्या शेतातील शेत माल मोठ्या प्रमाणात चोरीला चालला तसेच माझ्या एका मित्राच्या टँकटरची बट्ररि सुद्धा चोरीला गेली या चोरट्याना पोलिसांनी आळा घालावा
संदीप बोडखे,
(त्रस्त शेतकरी हिवरखेड)