अचानक वाढलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे कुलरच्या मागणीत वाढ
कुलरची अचानक भाववाढ?
दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे
हा उन्हाळा सुरुवातीला कमी अधिक प्रमाणात तापला होता तर एप्रिलच्या शेवटी व मे महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेचा विक्रमी उच्चांक नोंदवला गेला आहे अचानक गेल्या आठवड्याभरापासून उष्णतेची लाट विदर्भासह जिल्हाभरात पसरली आहे तर नागरिकांचे जिने हैराण झाले आहे तर बाजारपेठेमध्ये दुपारच्या वेळात गर्दी सुद्धा ओसरली आहे त्यामुळे कुलर सुद्धा वातावरण थंड करण्याला अयशस्वी झाले आहेत तर मध्यमवर्गीयांनी सुद्धा सौर पॅनल बसवून घरामध्ये एसी लावण्याच्या संकेत प्रचंड वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे तर सर्वसामान्य नागरिकांना एसी खरेदी करणे शक्य नसल्याने त्यांनी कुलर खरेदी करण्याकडे कल दिला आहे तर या कुलरची अचानक भाव वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना कुलर खरेदी करणे सुद्धा अशक्य झाले आहे आता शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिकांचे डोळे वरून राजाच्या आगमनाकडे लागले आहे तर आणखी तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम असल्याचे हवामान खात्याच्या वतीने अंदाज व्यक्त करण्यात आले तर लग्नसराई सुरू असल्याने भेट देण्यासाठी सुद्धा कुलर महागला आहे
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)