इयत्ता दहावी मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल ॲक्सिस बँकेच्या वतीने मनस्वी दानडेचा सत्कार

 

इयत्ता दहावी मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल ॲक्सिस बँकेच्या वतीने मनस्वी दानडेचा सत्कार

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

दर्यापूर तालुक्यात बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेली ॲक्सिस बँक यांनी सामाजिक बांधिलकी जपत दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाची विद्यार्थिनी मनस्वी दानडे हिने यंदाच्या दहावी परीक्षेत 99.80% गुण प्राप्त करत तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे मनस्वी दानडे सह श्रेया प्रकाश धर्माळे हीणे 96 पॉईंट 80 टक्के गुण प्राप्त केले तर कु श्रावणी निलेश काळे हिने सुद्धा 94.80% गुण प्राप्त करत तिलाही ॲक्सिस बँकेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या या मुलीवर संपूर्ण तालुका व जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर अनेक सामाजिक संघटनांनी थेट त्यांच्या घरी जाऊन आई-वडील व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आशीर्वाद दिले तर यामध्ये ॲक्सिस बँकेच्या वतीने सुद्धा बँकेचे मॅनेजर श्री बैतुले साहेब यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनस्वीच्या घरी जाऊन तिचा येथोचित सन्मान केला व पुढीलशैक्षणिक कारकीर्दतेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शाखा व्यवस्थापक अमोल बैतुले सर सहाय्यक मॅनेजर चंद्रशेखर तिडके सर व अक्षय कडू व मनस्वी दानडेचे आई-वडील यावेळी उपस्थित होते

Spread the love
[democracy id="1"]