दहिगाव रेचा येथिल इंदिरा गांधी विद्यालयात गुणवत्तेची परंपरा कायम.
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी विशेष तालुका प्रतिनिधी
दि.दयाराम पटेल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित इंदिरा गांधी विद्यालय दहीगाव रेचा येथील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे विद्यालयातुन एकूण 39 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये विशेष प्राविण्यासह 8 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीमध्ये 21 विद्यार्थी यांनी गुण प्राप्त केले. शाळेचा निकाल 94 .87% लागला आहे.मार्च 2023 मध्ये झालेल्या एचएससी परीक्षेमध्ये श्रुतिका गजानन वाघमारे हिने 81.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे द्वितीय क्रमांक साक्षी सुरेश इंगळे 81.00% मिळवुन कायम राखला तर तृतीय क्रमांक ईश्वरी अनिल जढाले 79.00% गुण मिळवून यश मिळवले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन दि. दयाराम पटेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनंत गुणवंत साबळे तसेच सचिव जयंत गुणवंत साबळे व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. हिरे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी वृंद यांनी केले आहे व पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)