ब्रेकिंग न्यूज ओडिशा कोरोमंडल रेल्वे अपघातात 200लोकांचा मृत्यू, 350 हून अधिक जखमी

ब्रेकिंग न्यूज ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामध्ये आज सायंकाळी सातच्या सुमारास दोन रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात झाला. या अपघातात 200 जणांचा मृत्यू झाला असून 350 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथके रवाना झाली असून अडकलेल्या प्रवाशांना डब्यांबाहेर काढण्याचे काम सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे दहा ते बारा डबे बालेश्वरजवळ घसरल्यानंतर ते शेजारील ट्रॅकवर कोसळले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी यशवंतपूर ते हावडा ही गाडी कोरोमंडल एक्सप्रेसच्या पडलेल्या डब्यांवर आदळली. त्यामुळे या गाडीचे देखील तीन ते चार डबे घसरल्याचे रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले. ही धडक जोरदार झाल्याने किमान 70 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेत 350 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींची संख्या अधिक असल्याने अनेक जणांना बसमधून रुग्णालयात नेल्याचे समजते. दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.बालासोर आणि नजीकच्या जिल्ह्यांतील वैद्यकीय पथके मदतीसाठी रवाना झाली आहेत. तूर्तास या मार्गावरील रेल्वे वाहतूक रोखण्यात आली असून या मार्गावरील काही गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले आहेत. पंधरा रुग्णवाहिका मदत कार्यामध्ये सहभागी झाले असल्याचे सांगण्यात आले

Spread the love
[democracy id="1"]