श्रीराम ऍग्रो सर्विसेस मध्ये दर्यापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र तसेच कृषी प्रदर्शन प्रदर्शनीचे आयोजन
दर्यापूर स्थित श्रीराम अॅग्रो सर्विसेस येथे तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र तसेच कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी बियाणे आणि रासायनिक खताच्या विक्रीचा शुभारंभ पण करण्यात आला. या कार्यक्रमात दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री बळवंत भाऊ वानखडे, अमरावती जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री सुधाकरजी भारसाकळे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुनील जी गावंडे यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमादरम्यान श्रीराम अॅग्रो सर्विसेस द्वारे जून ते सप्टेंबर महिन्याचा डॉक्टर अक्षय देवरस यांचा हवामान अंदाज देखील सांगण्यात आला. तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या बी बियाणे आणि रासायनिक खतांबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी श्री राजकुमार अडगोकार व पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री सुरेशजी रामाकडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्रीराम अॅग्रो सर्विसेस चे संचालक रोहित गणोरकर व श्रवण लढ्ढा सोबतच संतोष ब्रदिया ,संदेश देशपांडे, कार्तिक कोल्हे, आकाश कोल्हे, प्रथमेश टोम्पे, मंगेश राऊत व मंगेश देवगिरे यांनी परिश्रम घेतले.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)