चौसाळा येथे सौ.रुखमाबाई वऱ्हेकर व कु .रेखा उर्फ छोटी साबळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानीत.
अंजनगावसुर्जी शहर प्रतिनिधी सागर साबळे
तालुक्यातील चौसाळा ग्रामपंचायत च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सन्मान पुरस्कार रूपमाबाई अनंत वऱ्हेकर व रेखा उर्फ छोटी सुभाष साबळे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ग्रामपंचायत स्तरावर महिला व बाल विकास या क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच हुंडाबळी, दारूबंदी याबाबत प्रबोधन करून समाज कार्य करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सम्मान पुरस्कार सन्मान करण्यात यावा असे पत्र ग्रामपंचायतला प्राप्त झाले असून त्यानुसार चौसाळा ग्रामपंचायत च्या वतीने अर्ज मागविण्यात आले होते चौसाळा ग्रामपंचायतला पुरस्कार करिता एकूण सहा अर्ज आले होते. त्यामधून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या ह.भ.प. सौ रुखमाबाई अनंत वऱ्हेकर, तसेच तुकडोजी महाराजांचे भजन च्या माध्यमातून विविध गावांमध्ये समाज प्रबोधन करणाऱ्या कु. रेखा उर्फ छोटी सुभाष साबळे या दोन्ही महिला चौसाळा गावातच नाही तर इतरही गावात आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून तसेच भजनांच्या माध्यमातून महिला व बाल विकासाकरिता समाज प्रबोधन करीत असतात तसेच अनिष्ट रूढी परंपरा ला फाटा देणाचा त्यांचा नेहमी प्रयत्न असून महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता त्या प्रयत्नशील असतात अशा महिलांची निवड चौसाळा ग्रामपंचायत स्तरावर निवड समितीने केली असून त्यांना आज ( दि. ३१) ला ग्रामपंचायत सभागृहात सन्मानपत्र, सन्मान चिन्ह तसेच शाल श्रीफळ व रोख पाचशे रुपये देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी चौसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदाताई पाखरे ,उपसरपंच मंगेश ढोरे, ग्राम विकास अधिकारी गजानन बेलसरे, ग्रामपंचायत सदस्य संजय काळमेघ, वृषाली सागर साबळे, कविताताई मेमनकार, विद्याताई काळमेघ, महेश दाभेराव ,पोलीस पाटील श्याम पाटील काळमेघ, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक काळमेघ,सागर साबळे, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक काळमेघ, राधाबाई मुराफे, श्याम काळमेघ, अंगणवाडी सेविका आशाबाई मेमनकर, करुणा पाखरे, प्रियंका चापले ,मायाताई इंगळे , आशा सेविका सुजाता मुऱ्हेकर, तसेच रोजगार सेवक मंगल उर्फ मुन्ना इंगळे उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)