कृषी निविष्ठा विक्रेता संघातर्फे संजय काळमेघ यांचा सत्कार

कृषी निविष्ठा विक्रेता संघातर्फे संजय काळमेघ यांचा सत्कार.

अंजनगावसुर्जी शहर प्रतिनिधी सागर साबळे

अंजनगाव सुर्जी तालुका कृषी निविष्ठा विक्रेता संघ च्या वतीने काल(दि३० )ला शहरातील बालाजी मंदिरात आयोजित कार्यक्रमात कृषी निविष्ठा विक्रेता संघाचे सदस्य असलेले संजय पाटील काळमेघ यांची नुकतीच अंजनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवड झाल्यामुळे विक्रेता संघातर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जगदीशजी सारडा यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे सचिव राजू जोरापूरकर कोषाध्यक्ष सुधाकर टिपरे, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, संजय पोटदुखे, मनीष मानकर, संजय बनाईत, विक्रम पाठक, विशाल घोगरे उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]