अंगणवाडी मदतनीस पदाकरीता १२ वी पास पात्रता असतांना उच्चशिक्षित महिला उमेदवारांची गर्दी.

अंगणवाडी मदतनीस पदाकरीता १२ वी पास पात्रता असतांना उच्चशिक्षित महिला उमेदवारांची गर्दी.

अंजनगावसुर्जी शहर प्रतिनिधी सागर साबळे

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मदतनीस पदासाठी आलेल्या उमेदवारांच्याअर्जा मधुन दिनांक २६ ला मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाली यामध्ये उच्चशिक्षित महिलांनी मदतनीस पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याला महीलांची नोकऱ्यांचे वेड,लालसा म्हणावे की रोजगाराचा अभाव म्हणावा परंतु आलेल्या ४०४उमेदवारामधे पदवीधर उच्चपदवीधर उमेदवारांनी मदतनीस पदांकरीता अर्ज करावे या बाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
सविस्तर वृत्त असे की अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ४२ अंगणवाडी केंद्रातील ४२ रिक्त पदांकरिता भरती प्रक्रियेला गेल्या दोन महिन्या अगोदर सुरुवात झाली होती.परंतु काही तांत्रिक कारणामुळे मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या दोन्ही पदाची भरती काही काळ स्थगित ठेवण्यात आली होती, परंतु त्यातील मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया आठदिवसा अगोदर पासून सुरुवात झाली,आलेल्या अर्जापैकी अपात्र आणि पात्र उमेदवारांची यादी दि.२६ ला प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये डी.एड, बी.एड, बी.एस.स्सी, एमएस,स्सी, एम.ए. या उच्चविद्या विभूषित विद्यार्थ्यांनींनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे, मदतनीस या पदाकरिता शासनाने इयत्ता बारावी ही पात्रता मागितली असताना प्राध्यापक, शिक्षीक ,लिपीक समकक्ष पात्रता असलेल्या महीला उमेदवारांनी मदतनिसच्या नोकरीसाठी देखील अर्ज केला,व त्या उमेदवार निवडीनंतर सामील होण्यास देखील तयार असुन आलेल्या अर्जांमध्ये पदवीधरांचे जास्त अर्ज असल्याने यामध्ये पदवीधरांची वर्णी लागणार हे स्पष्ट दिसून येत आहे. प्रसिद्ध झालेली यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय व महिला व बाल विकास कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे उमेदवारांना बघायला मिळणार आहेत. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास आठ जून पर्यंत तो स्वीकारल्या जाईल अंजनगाव सुर्जी तालुक्यातील ४२ अंगणवाडी मदतनीस या पदाकरिता एकूण ४०४ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी ३४०उमेदवारांचे अर्ज पात्र झाले व ६४अर्ज अपात्र असल्याचे प्रभारी महिला व बालविकास अधिकारी शरयू धुमाळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.बेरोजगारी आता पद सुद्धा पाहत नाही हाताला काम महत्त्वाचे असताना आपण उच्चशिक्षित असून सुद्धा मिळेल ती नोकरी करण्यास उच्चशिक्षित बेरोजगार मिळेल ती नोकरी करायला तयार असून मदतनीस पदाकरिता वर्ग बारावी पास ही शैक्षणिक पात्रता असून सुद्धा या पदाकरिता उच्चशिक्षित उमेदवार अर्ज करत असताना दिसत आहे.

Spread the love
[democracy id="1"]