हॉटेल आस्वाद टी पॉइंट बाभळी समोरील अकोट रोडवर खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा प्रताप 

हॉटेल आस्वाद टी पॉइंट बाभळी समोरील अकोट रोडवर खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा प्रताप

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

दर्यापूर येथील आस्वाद हॉटेल बाभळी टी पॉईंट अकोट अकोला मार्गावर खड्ड्याचे प्रमाण वाढल्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे काही वर्षा अगोदर महामार्ग निर्मिती झाली असता बाभळी टी पॉईंट ते अकोला टी पॉइंट पर्यंत रस्त्याचे बांधकाम रखडले होते शहरातील सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केल्याने या कामाला सुरुवात करण्यात आली मात्र एका वर्षातच या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे किरकोळ अपघात व मोटरसायकल धारकांना याचा नाहकत्रास सहन करावा लागत आहे क्रीष्णा बार समोर आस्वाद हॉटेल समोरील हा परिसर मोठ्या वाहतुकीचा असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते तरी संबंधित विभागाने ताबडतोब या जीव घेण्या मार्गाची दुरुस्ती करावी जेणेकरून भविष्यात मोठ्या अपघाताची मालिका घडणार नाही याची नोंद घेत सदर रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्याची येथील व्यावसायिकांनी एका वृत्तपत्राद्वारे मागणी केली आहे

Spread the love
[democracy id="1"]