दहिगाव रेचा येथे सहकार महर्षी स्व.प्रा.गुणवंतराव साबळे यांचा 20 वा स्मृति दिन संपन्न

दहिगाव रेचा येथे सहकार महर्षी स्व.प्रा.गुणवंतराव साबळे यांचा 20 वा स्मृति दिन संपन्न

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका विशेष प्रतिनिधी:

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दहिगाव रेचा येथे प्रख्यात सहकार महर्षी स्व. प्रा. गुणवंतराव उपाख्य बाबसाहेब विष्णुपंत साबळे यांचा स्मृति दिन संपन्न झाला असुन या निमित्त त्यांच्या फोटोचे पुजन, हार अर्पण व दीप प्रज्वलन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्व. प्रा. गुणवंतराव साबळे यांचा जिवन कालखंड हा राजकीय, सामाजिक दृष्ट्या सर्व सामान्य जनते च्या हिताचे होते त्यांनी समाज हिता साठी स्वतःची प्राध्यापक पदाची नोकरी सोडून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला त्यांची दुरदृष्टी ही विकासात्मक दृष्टीने होती त्या साठी त्यांनी सहकार क्षेत्राला महत्व देत तालुक्यात अनेक सहकारी संस्था उभारणीस आणल्या जेणे करून शेतकऱ्यांचा, नागरिकांचा, युवकांचा या सहकार क्षेत्रातुन विकास होईल आणि याच धेयधोरणातूनच त्यांना सहकार महर्षी ही पदवी प्राप्त झाली. तसेच ते स्वतः प्राध्यापक असल्या कारणाने शिक्षणाचे महत्व जाणुन त्यांनी गावातच शिक्षणाची निव रोवली गावातच दि. दयाराम पटेल शिक्षण संस्थेची स्थापना केली अशा या कर्तव्य निष्ठ असलेले व्यक्तिमत्वाची आज 20 वा स्मृतिदिन भावपुर्ण दृष्टीने साजरा करण्यात आला. तसेच या कार्यक्रमा निमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे नव नियुक्त सभापती अडव्होकेट जयंत साबळे यांचा सत्कार करण्यात आला तर एच एस सी परीक्षे मध्ये उत्कृष्ट क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनींचे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. मंगळे तर प्रास्ताविक प्राचार्य एस. एन. हिरे यांनी केले यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत साबळे, प्रमुख पाहुणे मधुकरराव कोलखडे, श्रीमती सत्यप्रभा गुणवंतराव साबळे सहीत महाविद्यालयाचे शिक्षक वृंद, व गावातील नागरीक उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]