दर्यापूर पोलीस स्टेशनची ऐतिहासिक कामगिरी कटाईला नेत असलेले पन्नास गौवंशचे पाठलाग करून वाचविले प्रान

दर्यापूर पोलीस स्टेशनची ऐतिहासिक कामगिरी
कटाईला नेत असलेले पन्नास गौवंशचे पाठलाग करून वाचविले प्रान

ठाणेदार संतोष ताले यांच्या नेतृत्वात दबंग कारवाई

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

मध्य प्रदेशातून आसेगाव मार्गे दर्यापूर कडून मूर्तिजापूरकडे 50 गोवंश जिवंत जनावरे एका ट्रकमध्ये कटाई साठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती दर्यापूर पोलिसांना आसेगाव येथील बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी दिली त्या माहितीच्या आधारे दर्यापूर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार संतोष ताले यांनी मुर्तीजापुर टी पॉइंट या ठिकाणी नाकाबंदी करत गोवंश घेऊन जात असलेला ट्रक पकडण्याचा प्रयत्न केल मात्र ट्रक चालकाने आपला ट्रक वेगाने चालवत नाकाबंदी केलेल्या डिव्हायडर ला धडक देत ट्रक हा मुर्तीजापुर मार्गे घेऊन फरार झाला सदर ट्रकचा पाठलाग दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी फिल्मी स्टाईलने केला 20 किलोमीटर पाठलाग करत अखेर मूर्तिजापूर जवळ गोवंश घेऊन जात असलेला ट्रक पकडण्यात यश आले सदर ट्रक मधील दोन्हीही आरोपींना दर्यापूर पोलिसांनी ताब्यात घेतले व ट्रक मध्ये कोंडून ठेवण्यात आलेले पन्नास गाई पैकी पाच गाईंचा मृत्यू झाला तर उर्वरित गाई ही मूर्तिजापूर येथे गौरक्षण मध्ये सुखरूप पोलिसांच्या बंदोबस्तात बाहेर काढण्यात आले.सदरची कार्यवाही दर्यापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार संतोष ताले,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर डोंगरे सिद्धार्थ आठवले, प्रदीप गणशे ,पवन पवार, नितुल बरगट ,अनिल आडे ,पाथरे यांनी केली .

Spread the love
[democracy id="1"]