पणज परीसरात चक्री वादळासह अवकाळी पावसाने केळीचे लाखोचे नुकसान एचडीएफसी पिक विमा कंपनीने पंचनामे करण्याची मागणी

पणज परीसरात चक्री वादळासह अवकाळी पावसाने केळीचे लाखोचे नुकसान

एचडीएफसी पिक विमा कंपनीने पंचनामे करण्याची मागणी

संजय गवळी
अकोट तालुका प्रतिनिधी

आकोट तालुक्यातील ग्राम पणज महसूल मंडळात रविवार दिनांक 21 मे 2023 ला दुपारी व मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टी चक्रीवादळ व मुसळधार पावसाने संपूर्ण पणज सह पणज मंडळात मोठ्या प्रमाणात केळीसह अनेक पिकांचे नुकसान झाले असुन परीसरातील उभ्या केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावेळी अवकाळी पाऊस आणी वादळी वाऱ्या ने केळी पिकाचे होत्याचे नव्हते झाले दिवस रात्र मेहणत करून हाता तोंडाशी आलेला केळीचा हंगाम हातातुन गेल्याने यावेळी हे चित्र पाहुन शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करणार तरी कधी झाडाचा घळ हा निसर्गाने शेतकऱ्यांचा हिसकावून घेतला यावेळी परिसरामधील परिपक्व झालेले केळीचे घड, लिंबू आणि उन्हाळी हायब्रीड जवारी ,कांद्याचे लावलेले पगार इत्यादी उन्हाळी पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे,शेतामधील कांद्याच्या पिकाचे लावलेले पगर कापणीला आलेले संपूर्ण पाण्यामध्ये भिजून नुकसान झाले आहे लिंबू च्या बगीच्या मधील झाडावरील जमिनीवर सळा पडलेला आहे तसेच लिंबूचे झाडे पण मोडून पडले आहेत यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी हायब्रीड ज्वारीची शेतकऱ्याने पसंती करून मोठ्या प्रचंड प्रमाणात पेरणी केली असता आज रोजी पूर्ण हायब्रीड ज्वारी जमीन दोस्त झाली असून शेतकरी कर्जबाजारी होत आहे केळी पिकाला झाडांचे संपूर्ण पत्ते पाने फाटली असून झाडाचे काही बुंदे मुळा सहित जमिनीतून उकडून पडली संपूर्ण बनामधील बाहेरचा भाग जमीन दोस्त झाल्याचे चित्र आज रोजी दिसत आहे केळीचे तीस ते पन्नास किलोचे घड वजनाने मोडून जमिनीवर पडले आहेत ऐन कापणीच्या वेळी शेतकरी अति संकटात सापडलेला आहे या अति अवकाळी पावसाने तसेच चक्रीवादळाने संपूर्ण पणज महसूल मंडळ हादरवून गेले असून या झालेल्या नुकसानाची एचडीएफसी पिक विमा कंपनीने तसेच कृषी विभाग आकोट महसूल विभाग अकोट या संबंधित विभागाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाचे भरपाई देण्यात यावी अशी संपूर्ण परिसरातील शेतकरी वर्गा कडुन मागणी होत आहे गजानन आकोटकर पणज केळी शेतकरी चक्रीवादळासह अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेल्या केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने तात्काळ पीक विमा कंपनी एचडीएफसी यांनी व कृषी विभाग तसेच महसूल विभाग यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा मोबदला द्यावा,दीपक धर्मे अकोली जहागीर केळी शेतकरी रविवार दि. 21/ 5/ 23 ला झालेल्या चक्रीवादळ पावसाने केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले तरी राजकीय नेत्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी,

Spread the love
[democracy id="1"]