पणज येथे एकता पॅनलचे उमेदवार विजयी आकाश कोल्हे ३०६ मतांनी विजयी
संजय गवळीअकोट तालुका प्रतिनिधी
आकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील बहुचर्चित असणारी पणज बोचरा गट ग्रामपंचायत च्या पोट निवडणुकीमध्ये एकता पॅनलचे युवा तरुन उमेदवार आकाश गौतम कोल्हे हे प्रचंड बहुमताने निवडून आले आहे,पणज येथील सरपंच मधुकराव कोल्हे यांचे निधन झाले होते ती जागा रिक्त असल्याने एका जागेसाठी पोट निवडणूक घेण्यात आली या पोट निवडणुकीमध्ये तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते त्यामधून एकता पॅनलचे आकाश गौतम कोल्हे यांना तब्बल ३०६ मते, ग्रामविकास पॅनलचे भास्कर कोल्हे यांना 274 तर जनता पॅनलचे कैलास वानखडे यांना 206 मते मिळाली निवडणूक निकाल लागताच एकता पॅनलचे नेते कार्यकर्ते निवडणूक मध्ये भरगच्च मतदान करून विजय खेचून आल्याबद्दल यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले यावेळी उपसरपंच श्रीमती कुसुम धनराज बोचे, कशमुल्ला खा पठाण, जाऊद्दीन, नितीन महल्ले, गोवर्धन राऊत, हरिभाऊ पायघन, विक्रम जायले, दिलीप महाल्ले, सागर इंगळे, तंटामुक्ती अ. विलास राऊत, पत्रकार दिनेश बोचे, विकास देशमुख तसेच कोणतेही मिरवणूक न काढता फटाक्यांची आताशबाजी न करता निवडणूक शांततेत पार पडली, यावेळी एकता पॅनलच्या प्रमुखांनी निवडून आलेल्या विजयी उमेदवारांना पुढील कारकीर्द ग्राम विकासासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी एकता पॅनलचे सर्व कार्यकर्त्यांनी विजयश्री साठी मोलाचे कार्य केले,
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)