खासदारकीचे ४ वर्ष पूर्ण केल्याबद्दल खासदार सौ. नवनीत राणा यांना त्यांच्या शिलेदाराकडून भावूक शुभेच्छा.

#अमरावती (SC राखीव जागा)

२७ मार्च २०१९ लोकसभा निवडणुकीची वेळ महाआघाडी, मित्रपक्ष व युवा स्वाभिमान पक्षाच्याअधिकृत उमेदवार सौ. नवनीत रवि राणा यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी ठरलेली तारिक होती. मा. धनंजय मुंडे, मा.अनिल देशमुख, मा.राजेश गवई, मा. रावसाहेब शेखावत, मा. रवि राणा व समस्त महाआघाडी, मित्रपक्ष व युवा स्वाभिमान पक्षाचे पदािकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या संख्यने मतदारसंघातील माय बाप जनता,युवक मित्र मैत्रिणी उपस्थित होत्या.गाजत वाजत सौ.नवनीत रवि राणा यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.परंतु इथून खरी लढाई सुरू झाली महाआघाडी व मित्रपक्षातील पहिल्या फळीतील नेते सोडले तर इथे प्रत्येकाची आरेरावी ऐकत मोठ मोठ्या घोषणा करणाऱ्या ज्यांना कवडीची ही किंमत त्यांच्या स्वपक्षात मिळत न्हवती अशे लोक सुद्धा निवडणुकीचा फायदा घेऊन मा. आमदार रवि भाऊ राणा यांच्यावर वाटतेल ते तोंडसुख घेत होते परंतु भाऊ नेहमी प्रमाणे कोणाला कुठलही उत्तर न देता आपल काम करत होते. जीवाच रान करून प्रत्येक आव्हानाला सामोरे जात होते.पण जीवार तर तेव्हा यायची जेव्हा सगळ्या नेत्यांचं मानसन्मान मोठेपणा मिरवण्यासाठी त्या पक्ष कार्यालयात मोठ मोठ्या गोष्टी करायला यायचे नुसत यायचं जेवायचं मोठ मो गैष्टी करायच्या आणि घरी निघून जायचं.परंतु एवढं सगळ झाल्यावर सुद्धा यांना करमत न्हवत प्रत्येकाला एकच भीती होती की जर सौ. नवनीत रवि राणा या जर निवडून आल्या तर आपल जिल्ह्यातील वजन कमी होईल.म्हणून सोबत असून सुद्धा काही लोक हे महाआघाडीचं पालन न करता सौ. नवनीत रवि राणा यांच्या विरोधात काम करायला लागले.परंतु काही लोक ही इमानदारीने काम करत होते रात्रंदिवस मेहनत करून काम करत होते.आता आला प्रचाराचा शेवटचा टप्पा आणि तेव्हा तर फक्त बोटांवर मोजता येतील इतकेच लोक मा. आमदार रवि भाऊ राणा यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते.शेवटी १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान पार पडलं व सगळी कडे एकच चर्चा होती की सौ. नवनीत रवि राणा या काही निवडून येत नाही.२३ मे २०१९ रोजी मतमोजणी सुरू झाली व पहिल्या १० फेऱ्या जवळपास सौ. नवनीत रवि राणा या पिछाडी वर होत्या आणि १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान पार पडल्यावर ज्या चर्चा रंगल्या होत्या त्या खर होतील असे वाटायला लागले परंतु तेव्हा फक्त एक माणसाला विश्वास होता की लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे आणि आपण निवडून येणार म्हणजे येणार आणि हे विश्वास ज्या माणसाला होता तो माणूस म्हणजे मा आमदार रवि भाऊ राणा यांना आणि शेवटी सायंकाळची वेळ ०५:०० / ५:३० सौ. नवनीत रवि राणा या ३५००० च्या मतांनी आघाडी घेत विजयी झाल्या.सौ. नवनीत रवि राणा या “खासदार” सौ. नवनीत रवि राणा झाल्या.आणि या विजयाचं जर श्रेय कोणाला प्रथम जात असेल तर ते माय बाप जनतेला व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या अविस्मरणय विजयाचे शिल्पकार सन्माननिय आमदार रवि भाऊ राणा यांना.म्हणून तर अमरावती जिल्ह्यातील लोक म्हणतात”सगळ्या नटांचा एकच पाना रवि राणा – रवि राणा”

– संस्कार राजेश जोशी

Spread the love
[democracy id="1"]