गारपीटसह वादळी पावसाने तालुक्याला अंजनगाव झोडपले.

गारपीटसह वादळी पावसाने तालुक्याला अंजनगाव झोडपले.

सागर साबळे
अंजनगांवसुर्जी ता.प्रतीनिधी दि.२१

रविवारी दिनांक २१एप्रिल रोजी चार वाजता दरम्यान पावसासह विजांच्या कडकडासह आलेल्या वादळामुळे परीसरातील शेतकऱ्याच्या तयार झालेल्या उन्हाळी ज्वारीसह,भाजीपाला,संत्रा,केळी पीकाला फाटका बसुन फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व वादळाने आनेक मोठ मोठी झाडे उन्मळुन पडली. गेल्या महीण्यात तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अखंड हजेरी लावत पावसाळा सदृष्य परीस्थीती निर्माण केली होती,उनेपुरे पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवार दिनांक २१रोजी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावुन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काढणीस तयार असलेल्या उन्हाळी ज्वारी व संत्रा केळी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले,यात वनोजाबाग व ईतर ठीकाणी गारसुद्धा पडली,आलेल्या वादळात विजेचा तांडव एवढा होता की नागरिकांमधे भयनिर्माण झाले होते,यात पंचायत समीती परीसरातील मुख्य प्रवेशद्वारा समोरच भलेमोठे निंबाचे झाड वादळी वाऱ्यामुळे उन्मळुन पडल्याने पंचायत समीतीचे प्रवेशद्वार बंद झाले व विद्युतखांब वाकुन परीसरातील विद्युत प्रवाह खंडीत झाला सुदैवाने काल रविवार सुटीचा दिवस असल्याने पं.स.कार्यालयात कोनीही नसल्याने कुठलीही हाणी झालेली नसुन उद्या मात्र पंचायत समीतीत दाखल होण्यास कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे,या वादळी पावसाने ऊन्हाळी ज्वारी खाली पडल्याने भाजीपाला तसेच संत्रा, केळी इतर फळबागांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून नुकसानशेतकऱ्यांनी नुकसान भरपाई ची मागणी केली आहे.

Spread the love
[democracy id="1"]