उत्कृष्ट तिफनकरी तिफन्या पुरस्कार धामंत्री या गावातील उत्कृष्ट शेतकरी शेतमजूर मा. नामदेवराव धवणे यांना प्रदान.
दि.21 मे 2023 भारताचे माजी पंतप्रधान व संगणक क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांचा स्मृतिदिन.
या स्मृतिदिनी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावती च्या वतीने गेल्या 17 वर्षापासून उत्कृष्ट शेतकऱ्यांचा राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.त्या अनुषंगाने तिवसा तालुक्यातील धामंत्री या गावातील उत्कृष्ट तिफनकरी श्री नामदेवराव धवणे यांना उत्कृष्ट तिफनकरी पुरस्कार ग्रामगीताचार्य सौ.पौर्णिम ताई सवाई यांच्या शुभहस्ते २१ मे २०२३ ला त्यांच्या शेताच्या बांधावर प्रदान करण्यात आला.याप्रसंगी श्री.धवणे यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना लोखंडी तिफन भेट देण्यात आली.आधुनिक व पारंपारिक शेतीचा समन्वय साधून शेतकऱ्यांनी पुढील काळात शेती व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल करावा व जुन्या पालनपारीक शेती व्यवस्थेचे जतन करावे असे आवाहन तरुण शेतकऱ्यांना राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय प्रकाश साबळे यांनी केले. याप्रसंगी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे प्रा. दिलीप काळे, मा. भैय्यासाहेब निचळ, मा.मिलिंद फाळके, मा. अविनाश पांडे, मा.नामदेवराव वैद्य, मा.राहुल तायडे, मा. जावेद खान, मा. ज्ञानेश्वर काळे, प्रा. सुनील सावळे, मा. सोपान फाले, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षय साबळे, मा.गोपालभाऊ महल्ले, तसेच शंतनु राऊत, गोपाल अळसपुरे, निलेश बोके व धामंत्री, उंबरखेड येथील तरुण शेतकरी वर्ग उपस्थित होता.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)