श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात राजकीय जबाबदारी चा अभ्यास.

श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात राजकीय जबाबदारी चा अभ्यास .

अंजनगाव सुर्जी ता प्रतिनिधी सागर साबळे

स्थानिक श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने,’वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या राजकीय जबाबदारीचा अभ्यास, या विषयावर बी ए भाग २ व भाग ३ मधील दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वरिष्ठ महाविद्यालयातील कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील १०० विद्यार्थ्यांच्या मुलाखतीद्वारे त्यांना प्रश्न विचारून राजकीय जबाबदारीचा अभ्यास केला. वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राजकारणाबाबतची जाणीव समाधानकारक आहे. असा निष्कर्ष या प्रकल्पातून निघाला. हा प्रकल्प राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा सुरेंद्र किन्हीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला.या प्रकल्पा करीता प्राचार्य डॉ वशिष्ठ चौबे यांचे सहकार्य लाभले.या प्रकल्पात सहभागी विद्यार्थी भूषण गूळदे, आदित्य शेरकर ,कू नेहा सोनपरोते,चेतन वाकोडे कू शिवानी निंबोकर यांना प्राचार्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.या प्रसंगी IQAC समन्वयक डॉ मंगेश डगवाल, डॉ जुगल मालधुरे, डॉ इंदल जाधव उपस्थित होते.

Spread the love
[democracy id="1"]