अंजनगाव सुर्जी येथील केळी उत्पादक शेतकरी व उत्कृष्ट प्रतीच्या केळी संपूर्ण भारतातील विविध राज्यात निर्यात करणारे युवा कृषी उद्योजक शेतकरी माननीय आशिक अन्सारी यांना सन 2023 चा अत्यंत मानाचा राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार जाहीर..
आशिक अन्सारी प्रगतशील शेतकरी असून त्यांचे राजकिय, सामाजिक क्षेत्रात अत्यंत चांगले काम आहे विविध जाती धर्मातील व्यक्तीचे त्यांचे अत्यंत कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध आहे.फळ बागायतदार शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन घेऊन निर्यातदार होणे काळाची गरज असल्याचे व आशिकभाई यांचे फळ बागायतदार शेतकऱ्यांनी अनुकरण केले पाहिजे असे मत राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.प्रकाशदादा साबळे यांनी व्यक्त केले पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मा.आशिक अन्सारी यांचे प्रवीणभाऊ नेमाडे,महेश खारोडे,अमर शिंगणे,वैभव खारोडे,हेमंतराव येवले,प्रदीपराव देशमुख,समी खान,सचिन लांडे,देवानंद टेकाडे,संजय काळमेघ आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे..