टाळ मृदंगाच्या गजरात दुमदुमली नांदगाव खंडेश्वर नगरी

टाळ मृदंगाच्या गजरात दुमदुमली नांदगाव खंडेश्वर नगरी

नांदगाव खंडेश्वर तालुका प्रतीनिधी

भागवताचार्य ह. भ. प. श्री उमेश महाराज जाधव (आळंदीकर) नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शिवाजी हायस्कूल नांदगाव खंडेश्वर येथे दि.५ मे २०२३पासून चालू असलेल्या बालसंस्कार शिबिराची मिरवणूक संपूर्ण शहरांमधून आज निघाली यावेळी शिबिरातील सर्व बालगोपाल वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांची शिस्त पावल्या भारुड पाहून प्रत्यक्षात पंढरपूर नांदगाव शहरामध्ये पंढरी अवतरल्याचा भास नांदगाव शहरवासीयांना झाला गावातील मंडळींनी या दिंडीमध्ये सहभागी होऊन दिंडीचा आनंद घेतला दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांना खाऊ वाटप ,शरबत वाटप करण्यात आले यावेळी गावातील मान्यवर मंडळी तरुण मंडळी शिबिर मुख्याध्यापक ह.भ.प.सुरज महाराज पोहकार ह.भ.प.भूषण महाराज गिरी,ह.भ.प. अक्षय महाराज लांडे ह.भ.प.विठ्ठल महाराज भेंडे गोपाल काकडे ह.भ.प.सोपान महाराज भटकर ह.भ.प. विशाल महाराज मालगे ,अमन मालवे अभिषेक पवार सुरज कडू  गोविंदा धंनधरे वैभव कुलकर्णी पुरुषोत्तम इखार पवन ठाकरे, रवी डांगे नामदेव महाराज निचत सागर पोफळे प्रशांत मोरे युवा संघर्ष ग्रुप व समस्त गावकरी मंडळींनी सुंदर नियोजन केले, या शिबिराचा समारोप दिनांक २० मे २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता मान्यवर मंडळीच्या उपस्थित पार पडणार आहेत

Spread the love
[democracy id="1"]