अमरावती जिल्हा कधीही जातीयवादाला बळी पडणार नाही जिल्हा सह.बँक अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे

अमरावती जिल्हा कधीही जातीयवादाला बळी पडणार नाही

दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे

जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी शेकण्याचे कट कारस्थान, हाणुन पाडा.जिल्हा सह.बँक अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे

 

आपला भारत देश हा विविधतेने नटला आहे अनेक सांप्रदायिक लोक भारत देशामध्ये पूर्वीपासून गुण्यागोविंदाने नांदत आलेले आहेत इतर धर्मासोबत सर्वांचे सलोख्याचे, प्रेमाचे संबंध प्रस्थापित,अशा वेळी आहे जातीय तणाव निर्माण करून आपली राजकीय पोळी शेकण्याचे कारण निर्माण केले जात आहे भारत देशात जातीय स्थिरता ही महत्त्वाची आहे प्राथमिक शिक्षणातुन सलोख्याचे धडे तुम्ही आम्ही बालपणी घेतले आहेत प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा सुरुवातीला राष्ट्रीय प्रतिज्ञा ही अनिवार्य करण्यात आलेली आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव एक आहोत हे केवळ ओठातूनच का ? ते पोटातून असणे सुद्धा तितकेच गरजेचे बनले आहे. याला सुजाण नागरिकांनी बळी पडू नये आपला देश हा संविधानावर चालत असून सुशिक्षित नवतरुणांनी जातीवादाला थारा देऊच नये शिक्षण व्यवसाय उदरनिर्वाह व सामाजिक बांधिलकी जपत संबंध सर्वाशी मधुर करणे गरजेचे आहे. नुकतेच गेल्या दोन दिवसा अगोदर कर्नाटक राज्यात काँग्रेसने एक हाती सत्ता स्थापन केली आहे पराभवाच्या भीतीपोटी इतर राज्यात जातीय दंगली घडून आपली राजकीय पोळी शेकण्याच्या संख्येत वाढ होत आहे जातिवाद घडवण्याचे अनेक कारणे आहेत आपल्या धर्माप्रमाणेच इतरही धर्मावर स्वतःच्या धर्मा इतकेच प्रेम देणे क्रमप्राप्त आहे प्रत्येक धर्म हा श्रेष्ठच आहे हे अंगीकारून आपली दैनंदिन जीवन प्रणाली पार पाडावी या जातीयवादाने धर्म विखुरले जात आहेत शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर मार्गक्रमण करून जातीयवादाचा संपूर्ण नष्ट करणे हे आजच्या युवकांसाठी आव्हान आहे ठराविक धर्मांध पक्षांच्या वतीने केवळ जातीयवादाचे बिजारोपण करून पक्ष वाढीसाठी वातावरण निर्मिती केली जात आहे परंतु अमरावती जिल्हा हा सुशिक्षित व सर्वाथाने समजदार असून यामधील तरुण व वयोवृद्ध नागरिक या जातीवादाला बळी नक्कीच पडणार नाहीत ही खात्री आहे केवळ राजकीय फायदा समाजात विरोध निर्माण करून हिंदू मुस्लिम अशी विभागणी केली जात आहे इतरही नागरिकांनी सामंजस्याने वागल्यास जातीयतेचा समूळ नष्ट होईल हे तितकेच खरे! कर्नाटक राज्यात दारुण पराभव झाल्याने भविष्यातील पराभवाची भाजपाला चिंता अधिक दाट झाली आहे कर्नाटकचा विजय हा पहावत नसल्याने अकोला मध्ये सुद्धा जातीय दंगली जाणून-बुजून घडून आणल्या जात आहेत अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी सुद्धा या जातीय तेढेला बळी पडूनये हे याप्रसंगीची सावधगिरी असेल.असे आवाहन सहकार महर्षी सुधाकर पाटील भारसाकळे यांनी समस्त जिल्हा वासियांना निवेदनाद्वारे केले आहे.

Spread the love
[democracy id="1"]