कृपासागर संत वासुदेव जी महाराज मानवता सेवा ट्रस्ट द्वारा संचालित श्री संत भास्कर महाराज बाल संस्कार शिबिर स्थळ आनंद छात्राला दर्यापूर
येथे चालू असलेल्या बालसंस्कार शिबिरामध्ये लहान मुलांना संस्काराचे धडे देतात ना श्री ह भ प सागर जी महाराज परिहार यांनी सुसंस्काराचे महत्त्व सांगताना सुसंस्कार हेच जीवन जन्मापासून तर मरेपर्यंत मनुष्याचे जे आयुष्य असते त्याला जीवन असे म्हणतात. हे जीवन दोन प्रकाराने जगल्या जाते एक सुसंस्काराने व एक कुसंस्काराने हे दोन्ही संस्कारच आहेत, पण या दोन्हीत जमीन अस्मानाचे अंतर आहे. सुसंस्काराने जीवन जगणारा मनुष्य आयुष्यात धन्य, आनंदी, सदाचारी, परोपकारी, अहिंसावादी, सत्यनिष्ठ, पवित्र बनून देश, राष्ट्र व समाजाचे हित साधुन स्वतःचे व समाजाचे कल्याण करतो ते ठीक गंगे प्रमाणे का फेडीत पाप ताप। पोखीत तिरीचे पादक। समुद्रात जाये आप। गंगेचे जैसे।।गंगा समुद्राला जाऊन मिळते तेव्हा तिच्या प्रवासात अनेकांचे कल्यान ती साधते तसेच सुसंस्कारी मनुष्याचे असते. म्हणूनच सुसंस्कार हेच जीवन आहे आणि मनुष्याने ते बालपणात मिळवलेच पाहिजे. असे मत महाराजांनी शिबिरार्थींना संस्काराचे धडे देत असताना मांडले यावेळी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच संस्थेचे शिबिर संचालक श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज तिडके शिबिर प्रमुख श्री ह भ प वैभव महाराज तराड मुख्याध्यापक श्री ह भ प मंगेश महाराज गावंडे, उपमुख्याध्यापक श्री ह भ प ऋत्विक महाराज शिंगणे, अभिषेक महाराज काळे, श्री ह भ प अविनाश महाराज शेळके, संजय महाराज शेलार, श्री राजेंद्र धोटे सर, श्री गजानन कोकाटे सर ,श्री कन्हैयालाल मलीये, श्री प्रवीण महाराज सित्रे हे उपस्थित होते.
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)