दहिगाव रेचा येथिल शेतकऱ्याच्या शेतातील गहु जळून खाक
महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी:
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा (बुजरूक) येथील अशोक रेचे यांच्या गट क्रमांक 13 या शेतातील गहु वीजवितरण वाहिनी मध्ये शॉक सर्किट झाल्या मुळे जळून खाक झाला आहे तसेच शेतातील संत्राची झाडे, जलवाहिनी असलेले ठिबक सिंचन सुद्धा जळाले.
शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे अशातच हाताशी आलेले मोठ्या मेहनितीने उभे केलेले पिक नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जवळपास सर्वच शेतकऱ्यांची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची झाली असुन शेती कशी करावी असा गंभीर प्रश्न? शेतकऱ्यांना पडला आहे.