संगीत ही फक्त एक कला नसून ती ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सुलभ मार्ग आहे
अक्षय महाराज लांडे
दर्यापूर तालुका विशेष प्रतिनिधी गौरव टोळे
श्री संत ज्ञानोबा तुकाराम सेवा समिती अकोला द्वारा संचालित तालुकास्तरीय श्री खंडेश्वर सर्वांगीण विकास भव्य बाल संस्कार शिबिर स्थळ श्री शिवाजी हायस्कूल नांदगाव खंडेश्वर येथे चालू असलेल्या बालसंस्कार शिबिरामध्ये लहान मुलांना श्री अक्षय महाराज लांडे संगीत कलेचे महत्व वारकरी चाली गौळणी हे शिकवण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर संगीत विषयाच्या शास्त्राचे ज्ञानाचे व कलेचे महत्व काय आहे हे देखील विद्यार्थ्यांना सांगत आहेत .संगीत या विषयाचे ज्ञान देत असताना ते सांगतात संगीत हा भक्ती मार्गातील एक सुलभ मार्ग असून देवाच्या उपासने मध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक संत मंडळी सुद्धा सांगून गेली जसे संत तुकाराम महाराज म्हणतात गायनाचे रंगी शक्ती अद्भुत ही अंगी अशी अनेक संतांची प्रमाणे देऊन अभंग. वारकरी गायनाचे महत्व त्यांनी मुलांना सांगितले वारकरी संप्रदायामध्ये गायनाचे महत्त्व व गायनाची पद्धती त्यांनी सांगितली व प्रात्यक्षिक पण दिले इतिहासातील गायनामध्ये घडलेली उदाहरणे अनेक मोठमोठ्या कलावंतांची माहिती त्यांनी मुलांना दिली शिबिरामध्ये असलेल्या मुलांमध्ये संगीत या विषयाचे महत्त्व व त्यांच्यामध्ये संगीताविषयी आवड निर्माण व्हावी याकरिता त्यांचा हा निस्वार्थी उपक्रम या शिबिराच्या माध्यमातून घेत आहेत व अनेकांनी संगीत विषयाची माहिती घेऊन ती आत्मसात करावी व वारकरी सप्रदायांमध्ये अनेक कलावंत घडावे याकरता त्यांचे प्रयत्न आहेत.यावेळी अनेक विद्यार्थी त्यांच्या या गायनाच्या पाठामध्ये उपस्थित होते.या शिबिराचे संचालक भागवताचार्य श्री उमेश महाराज जाधव शिबिर मुख्याध्यापक भागवताचार्य श्री सुरज महाराज पोहोकार संस्कृत शिक्षक श्री भूषण महाराज गिरी गायनाचार्य श्री विठ्ठल महाराज पाटील मृदंगाचार्य श्री सोपान महाराज भटकर श्री विशाल महाराज मालगे श्री गोपाल पाटील काकडे आधी करून संपूर्ण महाराज मंडळी या शिबिराकरीता उपस्थित आहे
![anjangaonexpress](https://secure.gravatar.com/avatar/2af4fcae832350cd4f25cdac42096a36?s=96&r=g&d=https://anjangaonexpress.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)