BREAKING.NEWS अकोला दोन गटात तुफान राडा वादग्रस्त पोस्ट वरून आता वातावरण गरम परिस्थिती नियंत्रणात

 

अकोला जिल्हा प्रतिनिधी संजय भटकर

समाजाच्या विरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करुन पोस्ट केल्याने काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याने दोन गटात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीच परिवर्तन दंगलीच्या रुपात झाले. परिस्थिति नियंत्रणात येत नसल्याने जुने शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. सध्या तणावपूर्ण शांतता पसरली आहे.शहरातील जुने शहर पोलीस ठाणे हद्दीत दंगेखोरानी दगडफेक आणि जाळपोळ केली. वाहने पेटविली. बेकाबू झालेल्या संपूर्ण परिस्थितीवर पोलिसांना नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. दोन्ही बाजूने तुफान दगडफेक झाली. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना आश्रू धुराचा वापर करावा लागला. दंगलखोरांनी अनेक दुचाकी आणि चार चाकी गाड्यांची नासधूस केली. यामध्ये एक दुचाकी आणि एक चारचाकी गाडी जाळण्यात आली. दंगलखोरांनी पोलीस व्हॅन आणि अग्निशमन दलाच्या गाडीच्या काचा फोडल्या. परिसरात आगीचे डोंब उसळले होते. अनेक नागरिकांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यामुळे सामान्य नागरीक भयभीत झाले होते. दंगलखोर एकमेकाच्या विरूद्ध नारेबाजी करीत दगडफेक करीत सुटले होते.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी यांनी जुने शहर भागात कलमी 144 लागू केली आहे.दोन्ही बाजूने झालेल्या दगडफेकीत दोघे जखमी झाले. यामध्ये एका पोलीस महिला कर्मचारीचा समावेश आहे. पोलिसांनी सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून जुने शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याच आवाहन लोक प्रतिनिधी, जिल्हा व पोलीस प्रशासनाने केले आहे.तत्पूर्वी सोशल मीडिया वरील पोस्ट संदर्भात तक्रार दाखल करण्यास शेकडो नागरीक रामदास पेठ पोलीस ठाण्यावर धडकले होते. रामदास पेठ पोलीस ठाणे हद्दीतील मरगट भागात दोन गटात तणावाची स्थिति निर्माण झाली होती. घटनास्थळी पोलीस पोहचून परिस्थिति नियंत्रणात आणली.

Spread the love
[democracy id="1"]